India 2025 Cricket Calendar: भारतीय क्रिकेटसाठी २०२४ हे वर्ष चढउतारांनी भरलेले होते. पुरुषांच्या टीम इंडियाने यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकला, पण या वर्षी खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांपैकी एकही वनडे सामना जिंकू शकला नाही. भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच कसोटी मालिका ०-३ ने गमावली. मेलबर्न कसोटीतील पराभवाने भारतीय संघाने २०२४ चा शेवट केला. तर महिला संघाला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते, परंतु वेस्ट इंडिजवर निर्भेळ विजय मिळवत संघाने २०२४ वर्षाचा शेवट केला. आता २०२५ मध्ये टीम इंडियाचे पुढील वर्षाचे वेळापत्रक कसं असेल, याचा आढावा घेऊया.

२०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी आणि भारतीय संघाच्या सामन्यांचं वेळापत्रक

३ ते ७ जानेवारी – भारत वि ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी

IND vs ENG ODI Series Full Schedule Timings and Squads in Detail India England
IND vs ENG: भारत वि इंग्लंड वनडे मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक वाचा एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
U19 T20 WC 2025 Gongadi Trisha break Shweta Sehrawat most runs record in tournament
U19 T20 WC 2025 : गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास! महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात केला मोठा पराक्रम
India Women's Won U19 T20 World Cup 2025 2nd Time in a Row vs South Africa
India Won U19 Women’s T20 WC: भारताच्या महिला संघाने घडवला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावले U19 टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
India vs England 2nd T20 Highlights in Marathi
IND vs ENG 2nd T20I Highlights : तिलक वर्माचा विजयी चौकार! टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी

महिला अंडर-१९ महिला विश्वचषक

महिला अंडर-१९ संघांमध्ये १८ जानेवारीपासून विश्वचषक खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा १८ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान खेळवली जाणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा सिडनी कसोटीत विश्रांती घेणार; बुमराहकडे नेतृत्वाची धुरा

इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताविरूद्ध ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं असून बॉर्डर गावस्कर मालिकेच्या अखेरच्या सामन्यानंतर टी-२० मालिका खेळवली जाईल.

भारत-इंग्लंड टी-२० मालिकेचं वेळापत्रक

पहिला टी-२० सामना – २२ जानेवारी- कोलकाता
दुसरा टी-२० सामना – २५ जानेवारी- चेन्नई
तिसरा टी-२० सामना – २८ जानेवारी- राजकोट
चौथा टी-२० सामना – ३१ जानेवारी- पुणे<br>पाचवा टी-२० सामना – २ फेब्रुवारी- मुंबई</p>

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग इलेव्हन कशी असणार? सिडनी कसोटी किती वाजता सुरू होणार?

भारत-इंग्लंड वनडे मालिकेच वेळापत्रक

पहिली वनडे- ६ फेब्रुवारी- नागपूर<br>दुसरी वनडे – ९ फेब्रुवारी – कटक
तिसरी वनडे- १२ फेब्रुवारी- अहमदाबाद

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (फेब्रुवारी-मार्च)

यंदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने हे हायब्रिड मॉडेल अंतर्गत दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. यापूर्वी भारतीय संघाने दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

२० फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२३ फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
२ मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
४ मार्च – उपांत्य फेरी – (भारत पात्र झाल्यास), दुबई
९ मार्च – अंतिम – (भारत पात्र झाल्यास), दुबई

हेही वाचा – Khel Ratna Award 2024 : मनू भाकेर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न, १७ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण

आयपीएल २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच काही दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम सुरू होईल. IPL 2025 चा पहिला सामना १४ मार्च रोजी होणार आहे. अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५

११-१५ जून – ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारत पात्र ठरल्यास, लॉर्ड्स (लंडन)

भारताचा इंग्लंड दौरा (जून-ऑगस्ट)

WTC २०२३-२५ फायनलनंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पुढील चक्र सुरू होईल. भारतीय संघाचा प्रथम इंग्लंड दौरा असणार आहे. टीम इंडिया २० जून ते ४ ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारत वि इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी – २०-२४ जून, हेडिंग्ले
दुसरी कसोटी – २-६ जुलै, एजबॅस्टन
तिसरी कसोटी – १०-१४ जुलै, लॉर्ड्स
चौथी कसोटी – २३-२७ जुलै, मँचेस्टर
पाचवी कसोटी – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, ओव्हल

भारतीय संघाच्या पुढील मालिका

ऑगस्टमध्ये – बांगलादेश दौरा, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका
ऑक्टोबर – वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी मायदेशात
ऑक्टोबर-नोव्हेंबर – आशिया चषक टी-२० स्वरूपात
नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका.
नोव्हेंबर-डिसेंबर – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका

महिला संघांचा वनडे विश्वचषक

एकदिवसीय विश्वचषक सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये खेळवला जाईल. हा विश्वचषक भारतातच होणार आहे, तर पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. त्याचे वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे.

Story img Loader