India A vs Australia A First Unofficial Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तयारीचा भाग म्हणून भारतीय अं संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात फारशी आशादायक झालेली नाही. मॅकके इथे सुरू झालेल्या पहिल्या अनऑफिशियल टेस्टमध्ये भारतीय संघाचा डाव १०७ धावांतच आटोपला आहे. भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील खेळाडू अ संघाचा भाग आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाडला भोपळाही फोडता आला नाही.
ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय अचूक असल्याचं सिद्ध केलं. पहिल्याच चेंडूवर बकिंगहमने ऋतुराजला माघारी धाडलं. भारतीय संघात स्थान पटकावलेल्या अभिमन्यू इश्वरनने काही काळ प्रतिकार केला मात्र आठव्या षटकात बकिंगहमनेच त्याचा प्रतिकार संपुष्टात आणला. त्याने ७ धावा केल्या. काऊंटी क्रिकेटमध्ये तसंच रणजी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या साई सुदर्शनने २१ धावांची खेळी केली. डोगेटने त्याला बाद केलं. देवदत्त पड्डिकलने ३६ धावांची संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. डोगेटने त्याला फिलीप्सच्या हाती झेल देण्यास भाग पाडलं.
गेली अनेक वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या बाबा इंद्रजीतला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याने ९ धावा केल्या. राष्ट्रीय संघातून बाहेर फेकला गेलेला आणि करारसूचीतून बाहेर झालेला इशान किशन सध्या पुनरागमनच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्यासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. त्याला केवळ ४ धावा करता आल्या. अष्टपैलू म्हणून भारतीय संघात स्थान पटकावलेल्या नितीश कुमार रेड्डीला डोगेटने भोपळाही फोडू दिला नाही. तळाच्या फलंदाजांपैकी नवदीप सैनीने २३ धावा करत संघर्ष केला. ऑस्ट्रेलिया अ संघातर्फे ब्रेंडन डोगेटने ११ षटकात अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स पटकावल्या. डोगेटने ६ निर्धाव षटकं टाकत भारतीय फलंदाजांवर वचक ठेवला. फर्ग्युस ओनील आणि जॉर्डन बकिंगहम यांनी डोगेटला चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलिया अ संघाचीही डळमळीत सुरुवात झाली. सॅम कोन्टासला मुकेश कुमारने तंबूत धाडलं. त्याला भोपळाही फोडता आला नाही. कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला प्रसिध कृष्णाने माघारी धाडलं. त्यालाही खातं उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी खेळलेला मार्कस हॅरिस १७ धावा करुन बाद झाला.