India A vs England Lions Test Series : अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघाने इंग्लंड लायन्सचा १३४ धावांनी पराभव केला. या विजयात भारताचे दोन फिरकीपटू शम्स मुलानी आणि सरांश जैन यांचे महत्त्वाचे योगदान होते, ज्यांनी ८ विकेट्स घेतल्या. मुलाणीने एकट्याने पाच आणि सारांशने तीन विकेट्स घेतल्या. भारताने दिलेल्या ४०३ धावांच्या विशाल लक्ष्यासमोर पाहुण्या इंग्लंड लायन्सचा संघ दुसऱ्या डावात २६८ धावांत गडगडला.
अशा प्रकारे भारताने तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. दुसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्या साई सुदर्शनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी (६०/५) आणि मध्य प्रदेशचा ऑफस्पिनर सारांश जैन (५०/३) यांनी मिळून आठ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे सकाळी २ बाद ८७ धावांवरुन पुढे सुरु झालेला इंग्लंड लायन्सचा डाव आटोपला. या डावात इंग्लंड लायन्सचा सलामीवीर ॲलेक्स लीसने ४१ धावांनी सुरुवात केल्यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. पण मुलानीच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याने ५५ धावांची खेळी खेळी साकारली.
शम्स मुलानीने कर्णधारासह पाच खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले –
त्यानंतर इंग्लंडची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात १२० धावा होती. पण संघाने २० धावांत आणखी तीन विकेट गमावल्यामुळे संघाची धावसंख्या सात विकेटवर १४० धावा झाली. मुल्लानीने इंग्लंड लायन्सचा कर्णधार जोश बोहॅनन (१८) आणि डॅन मोस्ले (०५) यांची विकेट घेतली. इंग्लंड लायन्स संघ आव्हानाशिवाय बाहेर जाणार नव्हता. यष्टिरक्षक फलंदाज ऑली रॉबिन्सन (८० धावा) आणि जेम्स कोल्स (३१ धावा) यांनी आठव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली आणि संघाला २०० धावांच्या पुढे सहज नेले.
हेही वाचा – IND vs ENG : तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची, तर भारताला ९ विकेट्सची गरज
भारताने दुसऱ्या डावात ४०९ धावा केल्या –
शम्स मुलानीने कोल्सला एलबीडब्ल्यू बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर जैनने रॉबिन्सनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि इंग्लंड लायन्सचा डाव आटोपल्याने सामना लवकर संपला. भारत अ संघाने पहिल्या डावात १९२ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ४०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात १९९ धावा आणि दुसऱ्या डावात २६८ धावा केल्या.