दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी करत भारतीय ‘अ’ संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघाला चांगलेच अडचणीत आणले असून, आता त्यांच्यावर फॉलोऑनचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ‘अ’ संघाची ९ बाद ३१२ अशी अवस्था असून ते अजूनही २७० धावांनी पिछाडीवर आहेत. इश्वर पांडेने सर्वाधिक चार बळी घेत यजमानांचे कंबरडे मोडले, तर जे. पी. डय़ुमिनी (८४) आणि रिली रोसुव (५७) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader