ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने खिशात घालत ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ केला. या विजयासोबत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा अपवाद वगळता सर्व संघाना एकदिवसीय मालिकेत त्यांच्यात देशात हरवण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 231 धावांचं आव्हान धोनी आणि केदार जाधव यांनी शतकी भागीदारी करत पूर्ण केलं.
अवश्य वाचा – Video : हा चेंडू पकडा, नाहीतर म्हणाल निवृत्त होतोयस का?
1990 साली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आपला पहिला वन-डे मालिका विजय मिळवला होता. यानंतर ठराविक वर्षांच्या कालावधीने भारतीय संघाने प्रत्येक संघाला त्यांच्या देशात पराभवाची धूळ चारली. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल संघ मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियालाही त्यांच्यात भूमीत पराभूत करुन भारताने क्रिकेट जगतातला आपला बोलबाला सिद्ध केला आहे. भारताचा अपवाद वगळता पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनीही अशी कामगिरी केली आहे.
असे आहेत भारताचे परदेशातील वन-डे मालिका विजय –
- विरुद्ध इंग्लंड – वर्ष 1990 – (2-0) ने भारत विजयी
- विरुद्ध झिम्बाब्वे – वर्ष 1998 – (2-1) ने भारत विजयी
- विरुद्ध वेस्ट इंडिज – वर्ष 2002 – (2-1) ने भारत विजयी
- विरुद्ध पाकिस्तान – वर्ष 2004 – (3-2) ने भारत विजयी
- विरुद्ध बांगलादेश – वर्ष 2004 – (2-1) ने भारत विजयी
- श्रीलंका – वर्ष 2008 – (3-2) ने भारत विजयी
- न्यूझीलंड – वर्ष 2009 – (3-1) ने भारत विजयी
- दक्षिण आफ्रिका – वर्ष 2018 – (5-1) ने भारत विजयी
- ऑस्ट्रेलिया – वर्ष 2019 – (2-1) ने भारत विजयी
अवश्य वाचा – जाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही – रवी शास्त्री