आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी मानांकनातील दुसरे स्थान टिकविण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडविणे किंवा जिंकणे अनिवार्य आहे. त्या दृष्टिकोनातून भारतासाठी ही मालिका फार महत्त्वपूर्ण आहे.
जर ही मालिका २-० अशी जिंकली तर भारताला एक गुण मिळेल व संघाच्या मानांकनात कोणताही बदल होणार नाही. जर न्यूझीलंडने मालिका २-० अशी जिंकली तर त्यांचे ८८ गुण होतील मात्र भारत ११८ गुणांवरून ११० पर्यंत खाली येईल. जर न्यूझीलंडने १-० असा विजय मिळविला तर ते सातव्या क्रमांकावर झेप घेऊ शकतात. भारताने ही मालिका गमावल्यास नक्कीच त्यांच्या क्रमवारीवर परीणाम होईल.
भारताचे चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना फलंदाजीच्या मानांकनात झेप घेण्याची संधी मिळणार आहे. कोहलीला पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान घेण्याची सुवर्णसंधी आहे. रविचंद्रन अश्विन हा गोलंदाजीत सध्या सातव्या क्रमांकावर आहे, त्यालाही  क्रमवारी सुधारण्याची चांगली संधी असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India admit nz tests a challenge
Show comments