दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिका आजपासून; विक्रमी विजयाचा भारताचा निर्धार
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नव्या-जुन्या खेळाडूंची चाचपणी भारताकडून केली जाणार आहे. भारतीय संघ गुरुवारी सलग १३ ट्वेन्टी-२० सामन्यांत विजयाचा विक्रम नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. परंतु दुखापतीमुळे केएल राहुलने संपूर्ण मालिकेतून माघार घेतल्याने यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याचा उद्देश मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पक्का केला आहे. गेल्या काही महिन्यांत त्वेषाने कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही सर्वोत्तम संधी भारताला मिळेल. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु मालिकेच्या पूर्वसंध्येला राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे उपकर्णधार पंतकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कुलदीप यादवलाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.२०१०नंतर आफ्रिकेने भारतातील कोणतीही मर्यादित षटकांची मालिका गमावलेली नाही. गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच आफ्रिकेचा संघ एकत्रित खेळत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने तेसुद्धा गांभीर्याने पाहात आहेत.
भारत-आफ्रिका ट्वेन्टी-२० मालिका:राहुलची माघार; पंतकडे नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नव्या-जुन्या खेळाडूंची चाचपणी भारताकडून केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-06-2022 at 01:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India africa twenty twenty series rahul dravid pantsouth africa determination record victory amy