क्रिकेट असो वा हॉकी, न्यूझीलंड संघाने गेल्या काही वर्षांत भारतीय चाहत्यांना अनेकदा अनेकदा निराश करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याला सेनवेस पार्क, पॉचेफस्ट्रूम येथे दुपारी १:३० पासून सुरुवात होणार आहे.तेव्हा भारतीय पुन्हा एकदा वाढले आहेत. अंडर-१९ टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची कामगिरी या स्पर्धेत उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघ अवघ्या एका सामन्यात हरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, सुपर सिक्स फेरीपूर्वी टीम इंडियाने त्यांचे सर्व गट सामने जिंकले. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना अवघ्या १० षटकांत जिंकला होता. आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा भारताच्या श्वेता शेहरावने केल्या आहेत. या स्पर्धेत तिने आतापर्यंत सर्वाधिक १९७ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – के एल राहुलनंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही अडकला विवाहबंधनात, प्रेयसीसोबत बांधली लग्नगाठ!

भारत महिला अंडर १९ संघ: शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता शेहरावत, रिचा घोष (यष्टीरक्षक), सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, हृषिता बसू, तितास साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, सोनम यादव, हर्ले गाला, सोनिया मेंधिया, शबनम एमडी, फलक नाझ, सोप्पधंडी यशश्री

न्यूझीलंड महिला अंडर १९ संघ: अॅना ब्राउनिंग, एम्मा मॅक्लिओड, जॉर्जिया प्लिमर, इसाबेला गझ (यष्टीरक्षक), इझी शार्प (कर्णधार), टॅश वेकलिन, केट इर्विन, पेज लोगेनबर्ग, नताशा कोडरे, अबीगेल हॉटन, केली नाइट, केट चँडलर, ऑलिव्हिया अँडरसन , लुईसा कोटकॅम्प, एम्मा इर्विन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India and new zealand face each other in the first semi final match of the womens u19 t20 world cup 2023 vbm