वृत्तसंस्था, धरमशाला

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी करणारे व प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवणारे भारत आणि न्यूझीलंड हे तुल्यबळ संघ आज, रविवारी आमनेसामने येणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोनही संघांनी चारपैकी चार सामने जिंकले आहेत. मात्र, सरस निव्वळ धावगतीमुळे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा आपली विजयी घोडदौड सुरू ठेवताना अग्रस्थान राखण्याचा, तर भारताचा न्यूझीलंडला मागे टाकत अग्रस्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल.

IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
eye on suryakumar yadav shreyas iyer in buchi babu tournament
बुची बाबू स्पर्धेत सूर्यकुमार, श्रेयसकडे नजर; मुंबई-तमिळनाडू एकादश सामना आजपासून
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय
Murder case filed against Shakib Al Hasan
Shakib Al Hasan : धक्कादायक! बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनविरोधात खुनाचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांना अप्रतिम खेळ केला आहे. दोन्ही संघांचे प्रमुख खेळाडू लयीत आहेत. त्यामुळे या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा सामना नयनरम्य धरमशालाच्या हिमाचल क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगणार असून येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. त्यामुळे विशेषत: सुरुवातीच्या षटकांत दोन्ही संघांतील फलंदाजांची कसोटी लागेल.

भारतीय संघाला या सामन्यात तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाविनाच खेळावे लागणार आहे. गेल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध आपल्याच गोलंदाजीवर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात हार्दिकच्या डाव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. भारताकडे हार्दिकसारखा दुसरा खेळाडू उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची उणीव भारताला निश्चित जाणवेल. यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी हा सर्वात आव्हानात्मक सामना असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीच्या एक पाऊल जवळ पोहोचेल. त्यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा >>>IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविडचे हार्दिक पांड्याबाबत सूचक विधान; म्हणाला, “संघाचा समतोल…”

न्यूझीलंड

’ धरमशालाची खेळपट्टी विशेषत: सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवण्यात हातखंडा आहे. तो रोहित आणि गिल यांना अडचणीत टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

’ बोल्टला मॅट हेन्री आणि लॉकी फग्र्युसन या वेगवान गोलंदाजांची साथ लाभेल. तसेच डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरनेही अप्रतिम गोलंदाजी केली असून चार सामन्यांत त्याच्या नावे ११ बळी आहेत.

’ न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त डेव्हॉन कॉन्वेवर असेल. कॉन्वेसह रचिन रवींद्र, विल यंग, डॅरेल मिचेल, कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर कसोटी लागेल.

हेही वाचा >>>IND vs NZ, World Cup 2023: टीम इंडियाला दुहेरी धक्का! इशान आणि सूर्याही न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार नाहीत? जाणून घ्या कारण

भारत

’ हार्दिक पंडय़ाच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यापैकी एकाला सहाव्या क्रमांकावर संधी मिळण्याची शक्यता आहे.

’ हार्दिक उपलब्ध नसल्याने गोलंदाजाचा एक पर्यायही कमी होईल. अशात आतापर्यंत फारशी चमक न दाखवू शकलेल्या शार्दूल ठाकूरला वगळून मोहम्मद शमीला संधी देण्याचा भारतीय संघ नक्कीच विचार करेल.

’ कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि केएल राहुल हे फलंदाज चांगल्या लयीत आहेत. रोहित आक्रमक सुरुवात करून देत असून मधल्या फळीत कोहलीने कामगिरीत सातत्य राखले आहे. या दोघांनीही एकेक शतक केले असून न्यूझीलंडविरुद्धही त्यांची कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरू शकेल.

’ हार्दिकच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमरा, सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या गोलंदाजांवरील जबाबदारी आणखीन वाढेल.

’ वेळ : दु. २. वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार