ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारतीय नेमबाज संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. भारतीय राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी २७ जणांच्या पथकाची घोषणा केली आहे. ४ ते १५ एप्रिलदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. २७ जणांच्या एकूण सदस्यापैकी १५ खेळाडू पुरुष तर १२ खेळाडू महिला आहेत.
असा असेल राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा नेमबाजी संघ –
पुरुष : –
५० मी. रायफल थ्री पोजीशन : संजीव रजपूत, चैन सिंग
५० मी. रायफल प्रोन : चैन सिंह, गगन नारंग
१० मी. एअर रायफल : रवी कुमार, दीपक कुमार
२५ मी. रॅपिड फायर पिस्तुल : अनिश, निरज कुमार
५० मी. फ्री पिस्तुल : जितू राय, ओमप्रकाश मिठरवाल
ट्रॅप नेमबाजी : मानवजित सिंह संधू, कीनन चिनाय
डबल ट्रॅप नेमबाजी : मोहम्मद असब, अंकुर मित्तल
स्कीट नेमबाजी : स्मित सिंह, सीराज शेख
महिला : –
५० मी. रायफल थ्री पोजीशन – अंजुम मुदगिल, तेजस्विनी सावंत
५० मी. रायफल प्रोन – अंजुम मुदगिल, तेजस्विनी सावंत
१० मी. एअर रायफल – अपूर्वी चंदेला, मेहुली घोष
२५ मी. रॅपिड फायर पिस्तुल – हिना सिद्धु, मनु भास्कर
ट्रॅप नेमबाजी – श्रेयसी सिंह, वर्षा बर्मन
स्कीट नेमबाजी – सानिया शेख, महेश्वरी चौहान