आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या फुटबॉल लीगला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) हिरवा कंदील दाखवला आहे. एआयएफएफच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पुढील वर्षी ही स्पर्धा आयएमजी-रिलायन्सतर्फे आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले.
‘‘आयएमजी-रिलायन्सने या स्पर्धेचे स्वरूप आणि सविस्तर माहिती सादर केली. आय-लीग स्पर्धा भारतीय फुटबॉलला आधार देणारी आहे. मात्र कमी कालावधीत होणाऱ्या या लीगमुळे भारतात फुटबॉलचा प्रसार जोमाने होईल. या स्पर्धेद्वारे भारतीय फुटबॉलला देशात लोकप्रियता मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळलेले अनेक महान फुटबॉलपटू या स्पर्धेत खेळणार आहेत,’’ असे एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी खेळाडूंना परवानगी न देण्याचा निर्णय आय-लीगमधील क्लब्सनी घेतला आहे. याबाबत पटेल म्हणाले, ‘‘एआयएफएफ, आयएमजी-रिलायन्स आणि आय-लीग क्लब्समध्ये कोणतेही वाद नाहीत. आय-लीग हे भविष्यातही पहिले प्राधान्य असेल. लवकरच सर्व मुद्दय़ांवर आम्ही तोडगा काढू.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा