भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने, मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

“गेल्या 6-7 महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहेत. संघातल्या प्रत्येक खेळाडूने त्यांच्या क्षमतेला साजेसा खेळ केला आहे.” सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. 5 जूनला साऊदम्पटनच्या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

Story img Loader