2024 Paris Olympic Highlights , Day 1 : पॅरिस ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी शानदार ठरला. नेमबाजीत मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुलची अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर त्याने बॅडमिंटन आणि हॉकीमध्येही चांगली सुरुवात केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला कडवी टक्कर दिली, पण सामना भारताच्या झोळीतच राहिला. बॅडमिंटनमध्ये आपल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या लक्ष्य सेनने अप्रतिम कामगिरी करत ग्वाटेमालाच्या पाच वेळा ऑलिम्पियन केविन कॉर्डनचा पराभव केला. पुरुष दुहेरीत चिराग आणि सात्विक जोडीने विजयाची नोंद केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India at Olympic Games Paris 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा पहिला दिवस खास राहिला. नेमबाजीत मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तुलची अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर त्याने बॅडमिंटन आणि हॉकीमध्येही चांगली सुरुवात केली.

18:17 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : ग्रुप फोटो काढताना हँडबॉल खेळाडूने हॉकी प्लेअर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज,

ग्रुप फोटो काढताना हँडबॉल खेळाडूने हॉकी प्लेअर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, गुडघ्यावर बसून… पुढे काय घडलं? पाहा VIDEO

Paris Olympic 2024: ग्रुप फोटो काढताना हँडबॉल खेळाडूने हॉकी प्लेअर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, गुडघ्यावर बसून… पुढे काय घडलं? पाहा VIDEO
18:03 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : आजच्या दिवसातील बाकी असलेले सामने

संध्याकाळी 7:10 वाजता: बॅडमिंटन – लक्ष्य सेन विरुद्ध ग्वाटेमालाचा केविन कॉर्डन, बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील सामना.

संध्याकाळी 7:30 वाजता: टेबल टेनिस – हरमीत देसाई विरुद्ध यूएईचा झैद अबो यामन, पुरुष एकेरी पहिली फेरी.

रात्री 8: बॅडमिंटन – सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध लुकास कॉर्वे आणि फ्रान्सचे रोनन लाबर, पुरुष दुहेरी गटातील सामना.

17:44 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : उद्या दुपारी साडेतीन वाजता मनू भाकरचा अंतिम सामना

उद्या दुपारी साडेतीन वाजता मनू भाकरचा सामना सुरू होईल

भारताच्या मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ती तिसरी राहिली. आता उद्या अंतिम सामने होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता मनू भाकरचे पदकाचे लक्ष्य असेल. तर भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान आता १५व्या स्थानावर आहे.

17:28 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : मनू भाकर अंतिम फेरीत

मनू भाकर अंतिम फेरीत

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. तिने पात्रता फेरीत 580-27 गुण मिळवले आणि ती तिसरी राहिली. त्याचवेळी भारताची रिदिमा सांगवान 15 वे स्थान मिळवून पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. सांगवानने 573-14 गुण मिळवले. रविवारी दुपारी साडेतीन वाजता अंतिम सामना होणार असून मनू भारतासाठी पदकाचे खाते उघडू शकते. अंतिम फेरीत, आठ नेमबाज तीन पदकांसाठी स्पर्धा करतील.

17:18 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : मनू भाकर पाचव्या स्थानी तर रिदिमा 19व्या स्थानी घसरली

मनू भाकर पाचव्या स्थानी, रिदिमा 19व्या स्थानी घसरली

10 मीटर एअर पिस्तूल महिला स्पर्धेत मालिका-5 नंतर भारताची मुन भाकर पाचव्या स्थानावर गेली आहे. ती मालिका-3 नंतर दुसऱ्या आणि मालिका-4 नंतर तिसऱ्या स्थानावर होती. तर रिदिमा सांगवान आता 19 व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत टॉप-8 खेळाडू पदक फेरीत प्रवेश करतील.

17:04 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजीच्या सामन्याला पावसाचा अडथळा

रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजीच्या सामन्याला पावसाचा अडथळा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले भारताचे टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी यांचा सामना पावसामुळे अद्याप सुरू झालेला नाही. हे दोघे पुरुष दुहेरीत गेल मॉनफिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन यांच्याशी सामना करणार आहेत

17:00 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : मनूकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या

भारताच्या मुन भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल महिला स्पर्धेत मालिका-3 नंतर दुसरे स्थान पटकावले आहे. आता मनूकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर रिदिमा सांगवान २४व्या स्थानी घसरली आहे. या स्पर्धेत टॉप-8 खेळाडू पदक फेरीत प्रवेश करतील.

16:49 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : मनू भाकरचा उत्कृष्ट फॉर्म कायम

मनू भाकरचा उत्कृष्ट फॉर्म कायम

मनू भाकरने तिसऱ्या मालिकेत 98 गुण मिळवले. त्याने शेवटच्या पाच शॉट्समध्ये 5 अचूक 10 धावा केल्या. मात्र, रिदम सांगवान अजूनही धडपडत आहे. मनूला आता उर्वरित तीन मालिकांमध्ये ही आघाडी कायम राखावी लागणार आहे.

16:45 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : मनू भाकर आणि रिदम सांगवान यांच्याकडून पदकाची आशा

मनू भाकर आणि रिदम सांगवान यांच्याकडून पदकाची आशा आहे

भारताच्या मनू भाकर आणि रिदम सांगवान या महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात चमकदार कामगिरी करत आहेत. पहिल्या मालिकेनंतर मनू चौथ्या स्थानावर तर रिदम सातव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत टॉप-8 खेळाडू पदक फेरीत प्रवेश करतील.

16:40 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 5 देशांनी जिंकली पदके

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या दिवशी आतापर्यंत 5 देशांनी पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये चीनने 2 सुवर्णपदके जिंकली आहेत, कोरिया प्रजासत्ताक आणि यूएसएने प्रत्येकी 1 रौप्यपदक जिंकले आहे. त्याचबरोबर ग्रेट ब्रिटन आणि कझाकिस्तानने 1-1 कांस्य पदक जिंकले .

16:36 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : पात्रता फेरीची पहिली मालिका संपल्यानंतर मनू चौथ्या स्थानावर

पात्रता फेरीची पहिली मालिका संपल्यानंतर मनू चौथ्या स्थानावर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या पहिल्या मालिका संपल्यानंतर भारताची मनू भाकर चौथ्या स्थानावर आहे तर रिदम सांगवान 7 व्या स्थानावर आहे. या फेरीच्या शेवटी, अव्वल-8 खेळाडू अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करतील.

16:33 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : समान गुण असूनही सरबजोत पात्र का होऊ शकला नाही

भारताच्या सरबजोत आणि जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरने प्रत्येकी 577 गुण मिळवले. रॉबिन वॉल्टरने 10 च्या आतल्या वर्तुळावर 17 शॉट्स मारले असले तरी सरबजोतला फक्त 16 शॉट मारता आले. याच कारणामुळे सरबजोतने नववे आणि जर्मन खेळाडू आठव्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

16:29 (IST) 27 Jul 2024
Paris Olympics 2024 1st Day : नेमबाजीत चीमा आणि सरबजोत पात्र ठरू शकले नाहीत

भारतासाठी आणखी एक धक्का. १० मीटर एअर पिस्तूल पात्रता स्पर्धेत भारताचा अर्जुन चीमा आणि सरबज्योत सिंग अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. सरबजोत नवव्या तर अर्जुन १८व्या स्थानावर आहे.

India at Paris Olympic 2024 Highlights : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ सुरूवातक झाली आहे. क्रीडा महाकुंभाच्या पहिल्या दिवशी सात वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू प्रतिनिधित्व करताना दिसले. ज्यापैकी हॉकी आणि टेनिससह काही खेळांत भारताने दमदार कामगिरी केली.