2024 Paris Olympic Day 2 Highlights: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. नेमबाज मनू भाकेर हिने भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक कांस्या पदक मिळवून दिले आहे. यासह भारताच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिने तिच्या पहिल्याच सामन्यात सहज विजय मिळवला आहे आणि सध्या देशातील नंबर वन पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयनेही विजयी सलामी दिली. बॉक्सर निखत जरीननेही तिचा पहिला सामना जिंकला असून ती पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. बलराज पन्वर याने रोईंगमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुटा यांनी नेमबाजीमध्ये अंतिम फेरी गाठल्याने भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. कमल शरथ, सुमित नागल यांनी पहिल्याच फेरीत पराभूत होत निराशा केली. तर भारताच्या महिला तिरंदाजी संघाचाही प्रवास पदकाविना संपला आहे.
India at Paris Olympic 2024 Live Updates Day 2: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज दुसरा दिवस असून भारताचे अनेक खेळाडू पदक पटकावण्यासाठी उतरणार आहेत.
१ वाजता - नेमबाजी - महिला १० मी एअर रायफल (अंतिम फेरी)
रमिता जिंदाल
३.३० वाजता - नेमबाजी पुरूष १० मी एअर रायफल (अंतिम फेरी)
अर्जुन बाबुटा
तिरंदाजी (संध्याकाळी ६.३० ते ९.००) भारतीय पुरूष संघ क्वालिफाय झाल्यास*
२९ जुलै
१२.०० वाजता - बॅडमिंटन पुरूष दुहेरी (ग्रुप स्टेज)
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी- चिराग शेट्टी
१२.४५ वाजता - नेमबाजी १० मी एअर पिस्तुल मिक्स्ड (पात्रता फेरी)
सरबजोत सिंग आणि मनू भाकेर
अर्जुन सिंग आणि रिदम सांगवान
१२.५० वाजता - बॅडमिंटन - महिला दुहेरी (ग्रुप स्टेज)
अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो
१ वाजता - नेमबाजी - ट्रॅप पुरूष (पात्रता फेरी)
पृथ्वीराज तोंडाईमन
३.३० वाजता - टेनिस पुरूष दुहेरी (दुसरी फेरी)
रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी
४.१५ वाजता - हॉकी पुरूष (ग्रुप स्टेज)
भारत वि अर्जेंटिना
५.३० वाजता
बॅडमिंटन - पुरूष एकेरी (ग्रुप स्टेज)
लक्ष्य सेन
६.३० वाजता - तिरंदाजी पुरूष संघ (उपांत्यपूर्व फेरी)
तरूणदीप रॉय, धरीज बोम्मादेवरा आणि प्रवीण जाधव
भारतीय संघ पात्र ठरल्यास,
७.१७ वाजता-उपांत्यफेरी
८.१८ वाजता - कांस्यपदक फेरी
८.४१ वाजता - सुवर्णपदक फेरी
रात्री ११.३० वाजता - टेबल टेनिस महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)
श्रीजा अकुला
भारताचा उत्कृष्ट आणि रँकिगमध्ये पुढे असणारा बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉयने पहिला सामना जिंकला आहे. प्रणॉयने पहिला सेट २१-१८ च्या फरकाने अटीतटीच्या सामन्यात जिंकला. तर दुसरा सेट एकहाती २१-१२ या फरकाने जिंकला. दोन्ही सेट जिंकत प्रणॉयने शानदार विजय मिळवला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817582649021792629
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय आज पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. त्याचा बॅडमिंटन पुरूष एकेरीमधील पहिला सामना जर्मनीच्या फॅबियन रॉथविरूद्ध होणार आहे. रॉथ आणि प्रणॉयचा पहिला सेट अटीतटीचा झाला, दोन्ही खेळाडू जबरदस्त खेळत होते. पण अखेरीस प्रणॉयने बाजी मारत २१-१८ च्या फरकाने पहिला सेट जिंकला आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817576878967816244
टेनिसमध्येही भारताला धक्का बसला. सुमित नागलला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. सुमितला यजमान देशाचा खेळाडू कोरेन्टिन माउटेट (जागतिक क्रमवारी- ६८) २-६, ६-२, ५-७ असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पहिल्याच फेरीतून सुमित नागल बाहेर झाला आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817541395017765260
तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे. हा संघ नेदरलँड्सविरुद्धचा सामना ६-० च्या फरकाने पराभूत झाला. अंकिता भकत, दीपिका कुमारी आणि भजन कौर यांना संघात चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817538768423038991
मनिका बत्राने महिला एकेरी टेनिस स्पर्धेत ३२च्या फेरीत प्रवेश केला आहे. मनिकाने अॅना हर्सीवर शानदार विजय मिळवून आपल्या मोहीमेला सुरूवात केली. टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ ६४ मधून राऊंट ऑफ ३२ मध्ये पोहोचणारी मनिका बत्रा दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तिच्याधी श्रीजा अकुला हिने विजय मिळवत पुढची फेरी गाठली. तिने ग्रेट ब्रिटनच्या ॲना हर्सीचा ४-१ असा पराभव केला. तिने पहिला गेम ११-८, दुसरा गेम १२-१०, तिसरा गेम ११-९ आणि पाचवा गेम ११-५ असा जिंकला. तिने फक्त एकच गेम गमावला. जेव्हा तिने हर्सीकडून चौथा गेम ९-११ ने गमावला.
भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनु भाकेरला पदक मिळतानाचा क्षण
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817518238185754843
सुमित नागलने पुरुष एकेरीच्या टेनिस स्पर्धेतील पहिल्या फेरीत पहिला सेट गमावला आहे. त्याने हा सेट ६-२ असा गमावला. त्याचा सामना MOUTET Corentin विरुद्ध आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या टेबल टेनिसच्या राऊंड ऑफ ६४ फेरीत भारताची मनिका बत्रा आणि ग्रेट ब्रिटनची ॲना हर्सी यांच्यातील सामना सुरू झाला आहे.
भारताच्या शरथ कमलला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पुरुष टेबल टेनिस एकेरीच्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्लोव्हेनियन खेळाडूविरुद्ध तो पराभूत झाला.
भारताची स्टार महिला बॉक्सिंगपटू निखत जरीनने जर्मन खेळाडूचा ५-० च्या फरकाने पराभव करून विजयाची नोंद केली आणि महिला बॉक्सिंग ५० किलो गटाच्या १६ च्या फेरीत आपले स्थान निश्चित केले.
पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीत भारताच्या अर्जुन बबुताने ६३०.१ गुण मिळवून पदकासाठी पात्रता मिळवली आहे. याच स्पर्धेत भाग घेणारा संदीप सिंग १२ व्या स्थानावर राहिला आणि तो पात्र ठरू शकला नाही.
नेमबाजीत भारताच्या मनु भाकेरने कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक पटकावून दिले आहे. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनु भाकेरला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. कोरियाच्या नेमबाजाने आघाडी मिळवली. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. मनू भाकेर २१व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनु भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनु दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनु मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिलं.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817507401421250651
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817507223607841036
नेमबाजीत मेडल मॅच सुरू असून भारताची मनु भाकर पहिल्या ५ शॉट्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. १० शॉटनंतर १०० गुणांसह मनु भाकर तिसऱ्या स्थानी. १४ शॉट्सनंतर मनु भाकर तिसऱ्या स्थानी.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817504129092038962
श्रीजा अकुला हिने टेबल टेनिसचा राउंड ऑफ ६४ सामना जिंकला आहे. तिला जर्मनीच्या क्रिस्टीना कलबर्गचे आव्हान होते. या सामन्यात भारतीय टेबल टेनिसपटूने ११-४, ११-९, ११-७, ११-८ असा विजय मिळवला.
टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला वि क्रिस्टीना कॅलबर्ग यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात आतापर्यंत श्रीजा ४-० ने आघाडीवर आहे. तर पुरूषांच्या १० मी. एअर रायफल पात्रता फेरीत संदीप सिंग आणि अर्जुन बाबुता खेळत आहेत.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817494952722481364
महिला एकेरी (R 64): श्रीजा अकुला विरुद्ध क्रिस्टीना कॅलबर्ग: दुपारी २.१५ वाजता
महिला एकेरी (R 64): मनिका बत्रा विरुद्ध अण्णा हर्सी: दुपारी ४ वाजता
पुरुष एकेरी (R 64): शरथ कमल विरुद्ध डेनी कोझुल: दुपार३ वाजता
पुरुष एकेरी (R 64): हरमीत देसाई विरुद्ध फेलिक्स लेब्रुन: रात्री ११.३० वाजा
तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सशी भिडणार आहे. नेदरलँड्सने पहिल्या फेरीच्या सामन्यात फ्रान्सचा पराभव केला. भारतीय संघ क्रमवारीत चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले. भारताच्या संघात दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि भजन कौर यांचा समावेश आहे.
बलराज पनवारने पुरुष एकेरीच्या स्कल्समध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि रिपेचेजमध्ये ७:१२.४१ च्या वेळेसह दुसरे स्थान मिळवले. अशा प्रकारे बलराज पदकाच्या शर्यतीत कायम आहे.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817470141094862889
भारताच्या इलावेनिलने चांगली सुरुवात केली होती पण तिला टॉप८ मध्ये स्थान मिळवता आले नाही. शेवटच्या सिरीजच्या ८व्या शॉटमध्ये तिने ९.९ गुण मिळवले ज्यामुळे ती टॉप ८ मधून बाहेर पडली. याआधी तिनी संपूर्ण सिरीजमध्ये आघाडी घेतली होती.
रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफल महिला पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. तिने ६३१.५ गुण मिळवले. रमिताची सुरुवात संथ होती पण तिने हळूहळू पुनरागमन केले आणि शेवटच्या सिरीजमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817477450592403658
पीव्ही सिंधूने ऑलिम्पिक २०२४ मध्ये विजयी सलामी दिली आहे. गट फेरीत सिंधूने सहज विजयासह सुरुवात केली. सिंधूने मालदीवच्या फातिमाथचा २१-९,२१-६ असा पराभव केला.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1817468237774274607
मनू भाकर : १० मीटर एअर रायफलची अंतिम फेरी गाठली
भारतीय हॉकी संघ: भारताने न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला
हरमीत देसाई: पहिल्या फेरीत ४-० ने विजयी
प्रीती पनवार: बॉक्सरने पहिला सामना ५-० असा जिंकला
सात्विक-चिराग: पहिला सामना २१-१४, २१-७ असा जिंकला
लक्ष्य सेन: गट फेरीतील पहिला सामना जिंकला
पॅरिस ऑलिम्पिक लाइव्ह प्रक्षेपण
Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर
पॅरिस ऑलिम्पिकचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी भारताला पदकाचे खाते उघडण्याची संधी आहे. आज पीव्ही सिंधू, शरथ कमल, मनु भाकर, एच एस प्रणॉय हे खेळाडू अॅक्शनमध्ये आहेत.