IND vs AUS 3rd Test Updates in Marathi: भारत वि ऑस्ट्रेलिया गाबा कसोटीत भारताची टॉप फलंदाजी ऑर्डर फेल ठरली. पण तरी जडेजा-केएल राहुल आणि बुमराह-आकाशदीप यांच्या भागीदारीमुळे भारताने फॉलोऑनचा धोका टाळला आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी अखेरच्या काही धावांची आवश्यकता असताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४४५ धावांचा डोंगर उभारला होता. बुमराह-आकाशदीपने उत्कृष्ट बचावात्मक फलंदाजी करत भारताचा फॉलोऑन टाळण्यात मोठी भूमिका बजावली.
गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची नववी विकेट रवींद्र जडेजाच्या रूपाने पडली. तेव्हा भारताची धावसंख्या ९ बाद २१३ धावा होती. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला ३३ धावांची गरज होती. भारताने फॉलोऑन टाळला नसता तर ऑस्ट्रेलियन संघ भारताला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण करू शकला असता, पण जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने तसं होऊ दिलं नाही. भारताच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला परत संकटातून बाहेर काढलं आहे.
हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेणार? गाबा कसोटीत बाद झाल्यानंतर दिले संकेत; Photo होतोय व्हायरल
जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने १०व्या विकेटसाठी आतापर्यंत ५५ चेंडूत ३९ धावांची भागीदारी रचली आहे. योग्य चेंडूंवर फटकेबाजी आणि बचावात्मक फलंदाजी करत या दोन्ही गोलंदाजांच्या फलंदाजी कौशल्याने सर्वच चाहत्यांना प्रभावित केलं. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी ६ धावांची आवश्यकता असताना आकाशदीप मोठा फटका खेळू पाहत होता. इतक्यात ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने संदेश पाठवत खेळाडूंना जणू काही आरामात खेळण्यास सांगितले. यानंतर बुमराह आणि आकाशदीप एकेक धावा करून खेळत होत. ४ धावांची गरज असताना आकाशदीपने जबरदस्त फटका मारत चौकारासाठी चेंडू पाठवला आणि मैदानावर चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. फक्त चाहते नाही तर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये गंभीर आणि कोहलीही जोरदार सेलिब्रेशन करताना दिसले.
भारताने फॉलोऑन टाळल्यानंतर खराब सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा सामना तिथेच थांबवण्यात आला. चौथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत भारताने ९ बाद २५२ धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १९३ धावांची आघाडी आहे. तर बुमराह १० धावा आणि आकाशदीप २७ धावा करून नाबाद परतले आहेत.
राहुल-जडेजाची खेळी महत्त्वपूर्ण
आकाशदीप बुमराहशिवाय केएल राहुल आणि रविंद्र जडेजाचे अर्धशतक गाबा कसोटीत महत्त्वपूर्ण ठरले. अवघ्या १६ धावांसाठी केएल राहुलचे शतक हुकलं आणि तो १३९ ८ चौकारांसह ८४ धावा करून स्लिपमध्ये झेलबाद झाला. केएल राहुल एका टोकावर पाय रोवून घट्ट उभा होता आणि त्याने भारताचा डाव पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावली. यानंतर जडेजाने राहुलला चांगली साथ दिली. जडेजाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्य दाखवून देत १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने महत्त्वपू्र्ण ७७ धावा केल्या.