विजय हजारे करंडक विजेत्या कर्नाटकला देवधर चषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रेयस अय्यरच्या भारत ब संघाने कर्नाटकवर ६ गडी राखून मात करत देवधर चषक पटकावला. कर्नाटकने रवीकुमार समर्थच्या शतकी खेळीच्या जोरावर २७९ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल भारत ब संघाने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कर्नाटकचं आव्हान परतवून लावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत ब संघाकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू इश्वरनने पहिल्या विकेटसाठी आपल्या संघाला ८४ धावांची भक्कम भागीदारी करुन दिली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि अनुभवी मनोज तिवारीने आक्रमक अर्धशतकी खेळी करुन आपल्या संघाचा विजय सुनिश्चीत केला. गोलंदाजीत भारत ब संघाकडून उमेश यादव आणि खलिल अहमद यांनी टिच्चून मारा करत कर्नाटकच्या फलंदाजांना जेरीस आणलं.

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक २७९/८ (रविकुमार समर्थ १०७, सी. एम. गौतम ७६, खलिल अहमद ३/४९, उमेश यादव २/४८) विरुद्ध भारत ‘ब’ २८१/४ (अभिमन्यू इश्वरन ६९, ऋतुराज गायकवाड ५८, मनोज तिवारी ५८, श्रेयस अय्यर ६१) निकाल – भारत ब संघ ६ गडी राखून विजयी