India B vs India A Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी २०२४ चे सामने सुरू झाले आहेत. पहिल्याच दिवशी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. भारत ए वि भारत बी चा सामना खेळवला जात आहे. तर दुसरीकडे, भारत सी वि भारत डी चा सामना खेळवला जात आहे आणि या सामन्यातही गोलंदाजांची कामगिरी पाहायला मिळत आहे. अनंतपूर आणि बेंगळुरूच्या खेळपट्ट्यांमध्ये फलंदाजांसाठी फारशी मदत मिळाली नाही. अपेक्षेच्या विरुद्ध वेगवान गोलंदाजांना भारतीय खेळपट्ट्यांवर खूप मदत मिळत आहे. भारत बी संघाकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

रस्ते अपघातानंतर आणि मोठ्या ब्रेकनंतर ऋषभ पंतने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. अभिमन्यू ईश्वरन आणि शुबमन गिल यांच्याकडे संघाचे कर्णधारपद आहे. शुभमन गिल भारत ए चा कर्णधार आहे. भारत बी विरुद्धच्या सामन्यात त्याने ऋषभ पंतचा अप्रतिम झेल टिपला.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

हेही वाचा – Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने राजकारणात ठेवले पाऊल, पत्नी रिवाबा जडेजाने फोटो शेअर करत दिली माहिती

आकाश दीपविरुद्ध, फलंदाजी करताना पंतने चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला नीट आदळला नाही आणि मिडऑफच्या दिशेने हवेत गेला. शुभमन गिल तिथे क्षेत्ररक्षण करत होता. गिलने मागे धावत जाऊन डाईव्ह करून जबरदस्त चेंडू टिपला. मागे धावत जाऊन डाईव्ह करून झेल टिपणं हा क्रिकेटमधील सर्वात कठीण कॅचपैकी एक मानला जातो.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातानंतर प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. पहिलाच चेंडू ऋषभला फुल टॉस चेंडू मिळाला आणि त्यावर त्याने एक चौकारही मारला. त्यानंतर त्याने डावातील १०व्या चेंडूवर विकेट टाकली, पंत ७ धावा करत बाद झाला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – गंभीर आजाराशी लढा देतोय ‘हा’ भारतीय वंशाचा क्रिकेटपटू, दिल्लीतील रूग्णालयात ICUमध्ये केलं दाखल

भारत बी संघाची मधली फळी पहिल्या डावात पूर्णपणे अपयशी ठरली. ५३ धावांवर संघाची दुसरी विकेट पडली. संघाने ३१ धावांमध्ये पुढील ५ विकेट गमावल्या. सर्फराज खानच्या बॅटमधून केवळ ९ धावा आल्या. पंत बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर नितीश रेड्डी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉशिंग्टन सुंदरलाही एकही धाव करता आली नाही. तर साई किशोरही १ धाव करत बाद झाला. मुशीर खान एका टोकाला पाय घट्ट रोवून७८ धावा करत उभा आहे. तर त्याच्यासह नवदीप सैनी फलंदाजी करत आहे. इंडिया ए कडून खलील अहमद, आकाशदीप सिंग आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Story img Loader