Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पाचवा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघात खेळवला जात आहे. आज (२३ फेब्रुवारी) दुबईत हा सामना पार पडत आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार? याकडे अवघ्या देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र, एकीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढत सुरु आहे आणि दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज जसप्रीत बुमराहने दुबई गाठली आहे. जसप्रीत बुमराहला भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दुबईत आयसीसी (ICC) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दुबईत जसप्रीत बुमराहने आयसीसीचा पुरस्कार स्वीकारला आहे. या संदर्भातील माहिती ‘आयसीसी’च्या अधिकृत हँडलवरून देण्यात आली आहे. बुमराहचा आयसीसी पुरस्कार २०२४ मध्ये जिंकलेल्या सर्व पुरस्कारांसह फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर, आयसीसी पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर, आयसीसी पुरुष टेस्ट टीम ऑफ द इयर, आयसीसी पुरुष टी २० टीम ऑफ द इयर या पुरस्काराचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला पाठिच्या दुखापतीने ग्रासलं होतं. शेवटच्या सामन्यात बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवला होता, त्यानंतर त्याला आरामाचा सल्ला देण्यात आला होता. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का होता.

दरम्यान, इंग्लंडच्या मालिकेत चार सामन्यांत १६.८९ च्या सरासरीने त्याने बुमराहने घेतलेले १९ विकेट्स असोत की ८.२६ च्या सरासरीने १५ महत्त्वाचे विकेट पटकावत भारताला टी २० वर्डकप विजेतेपद जिंकून देणे असो, त्याच्या या कामगिरीमुळे त्याला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. ज्यामध्ये आयसीसी पुरुष कसोटी खेळाडूचा वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार, आयसीसी पुरूष क्रिकेटपटू पुरस्कार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Story img Loader