IND vs ENG 2nd T20I Highlights in Marathi: तिलक वर्मा आणि रवि बिश्नोईच्या फलंदाजीने चेन्नईतही भारताला २ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला. अटीतटीच्या या सामन्यात एकटा तिलक वर्मा शेवटपर्यंत मैदानात उभा राहिला आणि ७२ धावांटी नाबाद खेळी केली. यासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारत वि इंग्लंड दुसरा टी-२० सामना खूपच अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कसुकता ताणून ठेवणारा चढाओढ कायम ठेवली पण भारताने बाजी मारत इंग्लंडवर मात केली.

भारत-इंग्लंड अखेरच्या २ षटकांतील थरार

भारताला अखेरच्या २ षटकांमध्ये म्हणजेच १२ चेंडूत १३ धावांची गरज होती. तिलक वर्मा आणि रवी बिश्नोई मैदानावर होते. पहिल्या २ चेंडूंवर तिलक वर्माने धाव घेतली नाही. तिसऱ्या चेंडूवर थेट २ धावा घेत सर्वांच्या ह्रदयाचे ठोके वाढवले. यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेत तिलकने बिश्नोईला स्ट्राईक दिली आणि रवीने पाचव्या चेंडूवर जबरदस्त चौकार लगावला. सहाव्या चेंडूवर बिश्नोई मोठा फटका खेळण्यासाठी बिश्नोई खाली बसला आणि चेंडू पॅडला लागला पण बॉल ट्रॅकिंग करत असताना चेंडू पिचच्या बाहेर पडल्याने नाबाद दिले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना तिलक वर्मा आणि रवी बिश्नोईने पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघाने पुन्हा एकदा सुरूवातीच्या षटकांमध्ये विकेट्स गमावले. पण संघाने सन्मानजनक १६६ धावांची चांगली धावसंख्या उभारली. इंग्लंडची फलंदाजीची सुरुवात पुन्हा एकदा चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकातच अर्शदीप सिंगने सलग दुसऱ्यांदा फिल सॉल्टला बाद केले. बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनाही विशेष काही करता आले नाही आणि ते स्वस्तात माघारी पडले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर हा सलग दुसऱ्या सामन्यात संघासाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला पण यावेळी तो अर्धशतकाच्या जवळपास पोहोचू शकला नाही. या चौघांनाही वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकुटाने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. सरतेशेवटी, जेमी स्मिथ आणि ब्रेडन कार्सने काही मोठे फटके मारले ज्यामुळे इंग्लंडला चांगली धावसंख्या गाठता आली.

गेल्या सामन्यात जिथे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टीम इंडियाला वेगवान सुरुवात करून दिली होती, यावेळी दोघेही स्वस्तात बाद झाले. अभिषेकने पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरविरूद्ध ३ चौकार मारले पण तो दुसऱ्याच षटकात बाद झाला. पुढच्याच षटकात संजू सॅमसनही बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला आणि सहाव्या षटकात बाद झाला. ध्रुव जुरेलचे संघात पुनरागमनही अयशस्वी ठरले, तर हार्दिक पांड्याही संघ ७८ धावांपर्यंत पोहोचताच बाद झाला.

अवघ्या ७८ धावांत ५ विकेट्स गमावल्यानंतर तिलकने कमान सांभाळत प्रथम वॉशिंग्टन सुंदरसह चांगली भागीदारी केली. दोघांनी ३८ धावांची झटपट भागीदारी केली पण सुंदर बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि अर्शदीप यांचाही निभाव लागला नाही. दरम्यान, तिलकने आपले अर्धशतक पूर्ण केले.

अवघ्या ७८ धावांत ५ विकेट्स गमावल्यानंतर तिलकने कमान सांभाळत प्रथम वॉशिंग्टन सुंदरसह चांगली भागीदारी केली. दोघांनी ३८ धावांची झटपट भागीदारी केली पण सुंदर बाद झाल्यानंतर अक्षर पटेल आणि अर्शदीप यांचाही निभाव लागला नाही. दरम्यान, तिलकने आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या ३ षटकात संघाला २० धावांची गरज होती आणि फक्त २ विकेट शिल्लक होत्या, पण बिश्नोईने २ दमदार चौकार मारून तिलकचे काम सोपे केले आणि संघाला विजयापर्यंत नेले. इंग्लंडकडून कारर्सने ३ विकेट घेतले.

Story img Loader