इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सोमवारी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारताच्या विजयाची क्रांती घडली. मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरसह (२/२२) अन्य गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा १५७ धावांनी धुव्वा उडवला. यापूर्वी, १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती. यंदा विराट कोहलीच्या शिलेदारांनी हा पराक्रम करताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने दिलेले ३६८ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारताच्या दुसऱ्या डावातील शतकवीर रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केलेलं एक ट्विट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून त्याने या विजयाचा आनंद शेअर करताना इंग्लंडचा ट्रोल करण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरलाय.
Ind vs Eng : सेहवागने पंतप्रधान मोदींचा फोटो पोस्ट करत इंग्लंडला केलं ट्रोल, म्हणाला…
सेहवागने ट्विट केलेला हा फोटो सध्या व्हायरल झालाय. पहिल्या १० तासांमध्ये पाच हजारांहून अधिक जणांनी तो ट्विटरवरुन रिट्विट करत शेअर केल्याचं दिसत आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-09-2021 at 08:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat england in oval test virender sehwag tweeted a photo of pm modi scsg