उत्कृष्ट सांघिक खेळ करीत भारताने जपानविरुद्धच्या दुसऱ्या हॉकी कसोटीत २-० असा विजय मिळविला. या विजयाबरोबर चार सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला होता.
भारतीय खेळाडूंनी समन्वयाचा चांगला प्रत्यय घडवीत या सामन्यात वर्चस्व गाजविले. एस.के.उथप्पा याने २९ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. ४८ व्या मिनिटाला धरमवीर सिंग याने भारतास २-० अशी आघाडी मिळवून दिली. एस. व्ही. सुनील याने मारलेला फटका जपानच्या गोलरक्षकाने परतवला, तथापि धरमवीर याने शिताफीने चाल करीत हा चेंडू गोलजाळ्यात ढकलला. जपान संघाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना यश मिळाले नाही.
हॉकी कसोटी मालिका : भारताची जपानवर मात
उत्कृष्ट सांघिक खेळ करीत भारताने जपानविरुद्धच्या दुसऱ्या हॉकी कसोटीत २-० असा विजय मिळविला. या विजयाबरोबर चार सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
First published on: 06-05-2015 at 03:05 IST
TOPICSभारतीय हॉकी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat japan 2 0 in second hockey test