बंगळूरु  : कर्णधार सुनील छेत्रीने पुन्हा एकदा केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने प्रतिस्पर्धी नेपाळचा कडवा प्रतिकार २-० असा मोडून काढत सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघासमोर शनिवारी नेपाळने अनपेक्षितपणे आव्हान उभे केले. नेपाळचा बचाव भेदण्यासाठी भारताला तब्बल ६१व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. सुनील छेत्रीने हा गोल करून भारताला आघाडीवर नेले. छेत्रीचा हा स्पर्धेतील चौथा गोल ठरला. त्याच्याकडून प्रेरणा घेत महेश सिंहने ७०व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. छेत्रीचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर १३९ सामन्यांत ९१ गोल झाले आहेत. या स्पर्धेत मंगळवारी भारताची कुवेतशी लढत होणार असून, या सामन्याने गटविजेता निश्चित होईल.  दरम्यान, शनिवारच्या पहिल्या सामन्यात कुवेतने पाकिस्तानचा ४-० असा पराभव करून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.