IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतातील क्रिकेट प्रेमींनी फटाके फोटून आनंद साजरा केला. विजयासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची कामगिरी केली. त्याने गोलंजादी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत चांगला खेळ करून भारताला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याचा खेळ पाहून मैदानावरच दिनेश कार्तिकने त्याला आदबीने नमस्कार केला. या फोटोची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 : भारताने पाकिस्तानला नमवलं! ५ गडी राखून दणदणीत विजय

सुरुवातीला गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. भुवनेश्वरकुमारने चार विकेट्स घेतल्या. तर हार्दिकने तीन विकेट्स घेत पाकिस्तानी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. विशेष म्हणजे फलंदाजीमध्येही त्याने धडाकेबाज खेळी करत भारतासाठी विजय खेचून आणला. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांच्यासारखे पहिल्या फळीतील खेळाडू बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा (३५) या जोडीने संयमी खेळ केला. पुढे जडेजा बाद झाल्यानंतर भारताची स्थिती बिकट झाली. मात्र यावेळीदेखील न डगमगता हार्दिकने संयमी खेळ करत १७ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या.

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 : केएल राहुल गोल्डन डकवर बाद, पाकिस्तानच्या नवख्या खेळाडूने उडवला त्रिफळा

दुसरीकडे सलामीला आलेला केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला. पहिल्याच षटकात राहुल शून्यावर बाद झाल्यामुळे संघावर दबाव वाढला. पुढे विराट कोहली-रोहित शर्मा या जोडीने मोठे फटके मारत संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले. या दोघांनी ४९ धावांची भागिदारी केली. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा (१२) स्वस्तात बाद झाला. विराट कोहलीने संघाची जबाबदारी स्वीकारत ३४ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एक षटकार लगावत ३५ धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोहम्मद नवाझने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला. पुढे रविंद्र जडेजा (३५) आणि सूर्यकुमार यादव या जोडीने संयमी खेळ करत ३६ धावांची भागिदारी केली.

Story img Loader