प्रचंड दडपणाखाली खेळणा-या भारतीय संघाने आज दिल्लीत लाज राखली.  दिल्लीत पाकिस्तानविरूध्दच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने पाकिस्तानाला १० धावांनी नमवले.
भारताच्या ईशांत, भुवनेश्वर, जाडेजा, अश्विन आणि शमीच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा १५७ धावांमध्ये धुव्वा उडाला. सामन्यामध्ये ईशांत शर्माने ३, भुवनेश्वर आणि अश्विननं प्रत्येकी दोन तर शमी आणि जाडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने पाकिस्तानला ४८ षटकं आणि ५ चेंडूंमध्ये १५७ धावांत रोखलं.
भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी अवघं १६७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र खराब सुरूवात झालेल्या पाकिस्तानला हे आव्हान ही पार करता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरूवात चांगली करत कामरान अकमल (०) आणि युनूस खान (६) यांना माघारी ढाडले. त्यामुळे आठ षटकांमध्य़े पाकिस्तानची अवस्था १४ धावांवर २ बळी अशी झाली होती.   
भारताचे रहाणे, गंभीर, कोहली, युवराजसिंग हे आघाडीचे फलंदाज अवघ्या ६३ धावांमध्ये बाद झाले. तर सुरेश रैना (३१) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (५५) खिंड लढवायचा प्रयत्न केला. मात्र अजमलनं रैनाचा आणि उमल गुलनं धोनीचा बळी घेतला. पाकिस्तानविरुद्ध मालिकेत बाद होण्याची धोनीची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर आलेल्या अश्विनला सईद अजमलनं भोपळाही फोडू न देता माघारी धाडलं.
त्यानंतर आलेल्या जडेजाने २७ धावा केल्या. भारताचा डाव ४३.४ षटकांत १६७ धावांत आटोपला. आजच्या सामन्यात विजय मिळवला असला तरी पाकिस्तानने ही मालिका २-१ अशी जिंकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा