Shubman Gill Yashasvi Jaiswal half century : भारताने चौथ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला आहे. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना टीम इंडियाची सलामीची भागीदारी तोडता आली नाही. एकीकडे यशस्वी जैस्वालने ५३ चेंडूत ९३ धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुबमन गिलनेही ३९ चेंडूत ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने भारताने २८ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.
या विजयासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ७ गडी गमावून १५२ धावा केल्या होत्या. यादरम्यान सिकंदर रझाने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. झिम्बाब्वेच्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना खलील अहमदने २ बळी घेतले. शिवम दुबे, तुषार देशपांडे, अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
यशस्वी जैस्वालची ५३ चेंडूंत नाबाद ९३ धावांची खेळी –
For his opening brilliance of 9⃣3⃣* off just 5⃣3⃣ deliveries, @ybj_19 is named the Player of the Match ??
— BCCI (@BCCI) July 13, 2024
Scorecard ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/yqiiMsFAgF
झिम्बाब्वेने दिलेल्या १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने १५.२ षटकांतच लक्ष्य गाठले. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने नाबाद १५६ धावांची विक्रमी भागीदारी केली. ज्यामध्ये यशस्वी जैस्वालने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना ५३ चेंडूंत नाबाद ९३ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि २षटकारांचा समावेश होता. शुबमनने त्याला चांगली साथ देत नाबाद ५८ धावांची खेळी केली. त्याे ३९ चेंडूंचा सामना करताना त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. अशा प्रकारे भारताने हा सामना १० विकेट्सनी जिंकला.
हेही वाचा – VIDEO : हार्दिक-अनन्याच्या डान्सवरून रियान पराग का होतोय ट्रोल? युजर्स म्हणाले, ‘असं काय आहे त्याच्यामध्ये…’
भारताने दुसऱ्यांदा सामना १० गडी राखून जिंकला –
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक संघांनी १० विकेट्स राखून लक्ष्य गाठले आहे. मात्र, भारताने हा पराक्रम दुसऱ्यांदा केला आहे. कारण भारताने २०१६ मध्ये पहिल्यांदा असे केले होते. तेव्हाही विरोधी संघ झिम्बाब्वेच होता. तो सामनाही हरारे येथे खेळला गेला होता. ज्यामध्ये झिम्बाब्वेने प्रथम खेळताना ९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केएल राहुल आणि मनदीप सिंग या सलामीच्या जोडीने भारताला १० विकेट्सने विजय मिळवून दिला. त्या सामन्यात मनदीपने ४० चेंडूत ५२ धावा आणि राहुलने ४० चेंडूत ४७ धावा करत टीम इंडियाचा १० गडी राखून विजय निश्चित केला होता. आता शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताला दुसऱ्यांदा टी-२० सामन्यात १० गडी राखून विजय मिळवून दिला आहे.
A sparkling ?-wicket win in 4th T20I ✅
An unbeaten opening partnership between Captain Shubman Gill (58*) & Yashasvi Jaiswal (93*) seals the series for #TeamIndia with one match to go!
Scorecard ▶️ https://t.co/AaZlvFY7x7#ZIMvIND | @ShubmanGill | @ybj_19 pic.twitter.com/xJrBXlXLwM— BCCI (@BCCI) July 13, 2024