बंगळूरु : नियमित आणि अतिरिक्त वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने लेबननवर ४-२ असा विजय मिळवत सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी आता भारताची मंगळवारी गाठ आणखी एक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बलाढय़ संघ कुवेतशी पडणार आहे. कुवेतने बांगलादेशाचा १-० असा पराभव केला.

आंतरखंडीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत लेबननवर विजय मिळवून भारताने विजेतेपदाचा मान मिळवला होता. गेल्या महिन्यातील या कामगिरीनंतर भारताने पुन्हा एकदा लेबननचे आव्हान परतवून लावले. 

सामन्यातील नियोजित ९० मिनिटे आणि नंतर तीस मिनिटांच्या अतिरिक्त वेळेनंतरही गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू शकली नव्हती. त्यानंतर शूटआऊटमध्ये भारताने बाजी मारली. भारताकडून कर्णधार सुनील छेत्री, अन्वर अली, महेश सिंह आणि उदांता सिंह यांनी गोल केले. लेबननकडून हसन मॅटाऊक, बाडेर यांना चेंडू गोलजाळय़ात मारण्यात अपयश आले. 

तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या लढतीत लेबननच्या आक्रमक खेळाचा सामना करताना भारतीय खेळाडूंना राखलेला भक्कम बचाव लक्षवेधी ठरला. यातही गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. नियोजित वेळेतही त्याने लेबननच्या आक्रमकांना यशस्वी होऊ दिले नाही. त्यानंतर पेनल्टीमध्येही गुरप्रीतने दोन प्रयत्न शिताफीने फोल ठरवले. ‘‘लेबननविरुद्ध खेळणे कधीच सोपे नसते. सामना पेनल्टीमध्ये गेल्याचा फायदा झाला. प्रत्येकाने अचूक लक्ष्य साधले. गोलरक्षक गुरप्रीतचे भरीव योगदान विसरून चालणार नाही. आता आम्ही पुरेशी विश्रांती घेऊ आणि मग अंतिम सामन्याचा विचार करू,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार छेत्रीने दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beats lebanon in penalty shoot out to enter saff championship finals zws