दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये रोहित शर्मा व विराट कोहलीशिवाय खेळणाऱ्या टीम इंडियाला वेस्ट इंडिजकडून परावाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी टीम इंडियानं संघात केलेल्या ‘प्रयोगां’ची मोठी चर्चा झाली होती. काहींनी या प्रयोगांवर टीकाही केली होती. पण संघप्रशिक्षक राहुल द्रविड मात्र प्रयोगांवर ठाम होता. अखेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात या प्रयोगांनी आपली करामत दाखवली. परिणामी भारतानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला अक्षरश: पाणी पाजलं आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली!
रोहित-विराटशिवाय खेळणाऱ्या टीम इंडियाच्या कामगिरीवर दुसऱ्या सामन्यानंतर टीका झाली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं सगळी कसर भरून काढली. टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभा केला. शुबमन गिल (८५), इशान किशन (७७), हार्दिक पांड्या (७० नाबाद) व संजू सॅमसन (५१) यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतीय फलंदाजांनी ५० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या बदल्यात ३५१ धावांचं अवाढव्य लक्ष्य वेस्ट इंडिजसमोर ठेवलं.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची हाराकिरी
विजयासाठी ३५१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भंबेरी उडाली. विंडीजच्या ११ पैकी फक्त ४ फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या गाठता आली. त्यातले तीन फलंदाज हे तळाच्या फळीतले होते! त्यामुळे विंडीजच्या वरच्या आणि मधल्या फळीनं भारतीय गोलंदाजांसमोर हाराकिरी केल्याचं स्पष्ट झालं.
भारताकडून मुकेश कुमारनं वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन विकेट्स अगदी स्वस्तात घेतल्या. त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरनं वेस्ट इंडिजची मधली फळी माघारी धाडली. त्यामुळे ५० धावांवर ६ गडी बाद अशी वेस्ट इंडिजची स्थिती झाली. नवव्या विकेटसाठी अलझारी जोसेफ आणि गुडाकेश मोतिये यांच्यात झालेल्या ५९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजला फक्त १५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे तब्बल २०० धावांनी भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव केला.
भारताचा विक्रमी विजय
दरम्यान, भारतानं या विजयासह नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतानं सर्वात मोठा मिळवलेला विजय हा १२५ धावांनी होता. २७ जून २०१९ रोजी झालेल्या सामन्यात भारतानं ही कामगिरी केली होती. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतानं तब्बल २०० धावांनी विजय मिळत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १३ एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरीही नावावर केली आहे.
भारतीय फलंदाजांची ‘चौफेर’ कामगिरी!
दरम्यान, त्याआधी भारतीय फलंदाजांची मैदानाच्या चौफेर फटक्यांची आतिषबाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं! इशान किशन व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला १९.४ षटकांमध्ये १४३ धावांची दमदार सलामी दिली. इशान किशन बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड ८ धावा करून स्वस्तात माघारी परतला. पुन्हा दुसऱ्या सामन्यासारखीच स्थिती होतेय की काय? अशी शंकेची पाल भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात चुकचुकली. पण त्यानंतर आलेल्या संजू सॅमसननं सुरुवातीपासूनच विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. अवघ्या १० चेंडूंमध्ये त्यानं २८ धावा कुटल्या. पहिल्या १३ चेंडूंमध्ये त्यानं तीन षटकार ठोकले होते!
९ षटकांमध्ये ६९ धावांची भर घातल्यानंतर सॅमनसन-गिल जोडी फुटली. यात शुबमन गिलच्या फक्त १८ धावा होत्या! सॅमसन आणि गिल पाठोपाठ तंबूत परतले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवनं जवळपास टी-२०च खेळत विंडीजच्या गोलंदाजांची पिसं काढली! दोन षटकारांसह ३० चेंडूंत त्यानं ३५ धावा कुटल्या. त्यापाठोपाठ ५२ चेंडूंत ७० धावा फटकावणाऱ्या हार्दिक पंड्यानंही मैदानाच्या चारही दिशांनी बॅट घुमत चेंडू टोलवायला सुरुवात केली. या चौघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं ३५१ धावांचा डोंगर उभा केला!