Indian Team Creates History IND vs NZ Test: भारत वि न्यूझीलंड कसोटीत भारतीय क्रिकेट संघाने मोठा इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघ४६ धावांवर सर्वबाद झाला होता. पण यानंतर भारताने दुसऱ्या डावात संयमाने पण चांगली फटकेबाजी करत पहिल्या क्रमांकाचा कसोटी संघ का आहे हे दाखवून दिलं आहे. यासह भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवत मोठी कामगिरी केली आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

विराट कोहलीने टीब्रेकपूर्वी एजाज पटेलच्या ३२ व्या षटकात एक दणदणीत षटकार खेचला. विराट कोहलीने हा षटकार लगावला आणि भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये नवी कामगिरी आपल्या नावे केली. भारतीय संघाने २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०२ षटकार लगावले आहेत आणि ही कामगिरी करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताच्या पाठोपाठ २०२२ मध्ये सर्वाधिक षटकार इंग्लंडने लगावले होते. पण एका कॅलेंडर वर्षात १०० पेक्षा जास्त षटकार लगावणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “कमीत कमी भारत ३६…”, टीम इंडिया ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मायकेल वॉनने उडवली खिल्ली, भारतीय चाहत्यांनी ‘अशी’ केली बोलती बंद

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार लगावणारे संघ

१०२* – भारत – २०२४ मध्ये
८९ – इंग्लंड – २०२४ मध्ये
८७ – भारत – २०२४ मध्ये
८१ – न्यूझीलंड – २०२४ मध्ये
७१ – न्यूझीलंड – २०२४ मध्ये

भारताने कसोटी क्रिकेटबरोबरच तिन्ही फॉरमॅटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहे. यशस्वी जैस्वालने भारतासाठी या वर्षी कसोटीत सर्वाधिक २९ षटकार ठोकले आहेत. त्यानंतर शुबमन गिल आणि कर्णधार रोहितने १६ आणि ११ षटकार ठोकले. जैस्वाल एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी षटकार मारण्याचा पराक्रम देखील नोंदवला आहे आणि २०१४ मध्ये माजी किवी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम ३३ षटकारांसह यादीत आघाडीवर आहे. २०२१ मध्ये सर्वाधिक ८७ षटकारांची नोंद, ऑल-टाइम चार्टमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१४ मध्ये ८१ आणि २०१३ मध्ये ७१ षटकारांसह न्यूझीलंड संघ टॉप-५ मध्ये आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “मी गंभीरच्या विचारांशी सहमत नाही की…”, दिनेश कार्तिक विराट कोहलीमुळे भारताच्या कोचबद्दल अचानक असं का म्हणाला?

रोहित शर्माने आतापर्यंत ८८ षटकार लगावले आहेत. याबाबतीत त्याच्यापुढे वीरेंद्र सेहवाग आहे. ज्याच्या नावावर एकूण ९१ षटकार आहेत. बेन स्टोक्स, मॅक्युलम आणि ॲडम गिलख्रिस्ट या तीन फलंदाजांनीच कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकले आहेत.