Ireland Cricketer Battling Acute Liver Failure: भारतीय वंशाचा आयर्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू सिमरनजीत सिंग उर्फ ​​सिमी सिंग आपल्या आयुष्याशी लढत आहे. सिमी सिंग गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याचे यकृत निकामी झाले असून सध्या तो गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. सिमी सिंगवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

आयर्लंड क्रिकेटपटू गंभीर आजाराशी देतोय लढा

२०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून सिमी हा आयर्लंड क्रिकेट संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याने ODI आणि T20I या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, क्रिकेटर सिमरनजीत सिंगच्या सासऱ्यांनी सांगितले की, सिमी ५-६ महिन्यांपूर्वी डब्लिनमध्ये असताना त्याला ताप आला होता. हा ताप येत जात राहिला. जेव्हा त्याने आयर्लंडमध्ये काही टेस्ट केल्या तेव्हा रोगाशी संबंधित फारसे परिणाम समोर आले नाहीत. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्याचे औषधही सुरू केले नाही. त्यानंतर उपचाराला उशीर झाल्याने सिमीची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्याच्यावर चांगले उपचार करण्यासाठी आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

हेही वाचा – Duleep Trophy 2024: भारतात जन्म अन् इंग्लंडकडून खेळले आंतरराष्ट्रीय क्रिकेट, कोण आहेत दुलीप सिंह? ज्यांच्या नावे भारतात खेळवली जाते मोठी देशांतर्गत स्पर्धा

भारतात आल्यानंतर मोहालीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू झाले, पण तेथेही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. मोहालीतील एका खासगी रुग्णालयात सिमीला टीबी असल्याचे सांगण्यात आले. जुलैच्या सुरुवातीला पीजीआय, चंदीगड येथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. तेथे टीबीवर उपचार सुरू करून त्याला अँटिबायोटिक्स देण्यात आले. नंतर कळले की त्याला टीबी नाही.

पुढे म्हणाले की, ताप कमी होत नसताना सिमीला पुढील तपासणीसाठी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सिमीला टीबी नाही, मात्र औषधांचा कोर्स पूर्ण करावा लागेल, असे सांगण्यात आले. टीबीच्या औषधांबरोबरच त्याला स्टेरॉईड्सही देण्यात आले. त्यानंतर त्याचा ताप पुन्हा वाढू लागला आणि त्याला कावीळ झाली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही त्याला पुन्हा पीजीआयमध्ये नेले, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा –६६ कोटी! कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने २०२३-२४ साठी भरला सर्वाधिक कर?

आयसीयूत दाखल केल्यानंतरही सिमीची तब्येत सतत खालावत गेली आणि त्यानंतर पीजीआयमधील डॉक्टरांनी त्याचे यकृत निकामी झाल्याचे सांगितले. त्यांनी सिमीला गुरुग्राममधील मेदांता येथे नेण्याचा सल्ला दिला कारण तो कोमात जाण्याची दाट शक्यता होती आणि त्यानंतर प्रत्यारोपण शक्य होणार नाही. ३ सप्टेंबर रोजी त्याला मेदांता येथे आणण्यात आले आणि आता तो यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहे.

सिमीचा जन्म मोहाली, पंजाब येथे झाला आणि त्याने अंडर-१४ आणि अंडर-१७ स्तरावर पंजाबचे यशस्वीपणे प्रतिनिधित्व केले, परंतु १९ वर्षांखालील स्तरावर तो पोहोचू शकला नाही. यानंतर २००५ मध्ये तो हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी आयर्लंडला गेला आणि तिथे व्यावसायिक क्रिकेट खेळू लागला. २००६ मध्ये, त्याला डब्लिनमधील मलाहाइड क्रिकेट क्लबने करारबद्ध केले आणि मग त्याचा आयर्लंड संघात समावेश करण्यात आला.

Story img Loader