India Bowling Coach Morne Morkel Becomes net Bowler Video: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल नेट गोलंदाजाची भूमिका बजावताना दिसले. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॉर्केल नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. तर केएल राहुल दुसऱ्या टोकाला त्याच्या चेंडूंचा सामना करत आहे. यानंतर व्हीडिओमध्ये बोलताना मोर्ने मॉर्कला काय म्हणालाय, जाणून घेऊया.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मॉर्ने मॉर्केलची भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने उघड केले की जवळपास वर्षभरात त्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ होती. मॉर्केलने सांगितले की, नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घेतली.
हेही वाचा – VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक
बंगळुरूमधील पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीनंतर धावा करण्याच्या दबावाचा सामना करत केएल राहुल मोठ्या कष्टाने सराव करत आहे. राहुल पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. पहिल्या डावात शून्य धावा आणि दुसऱ्या डावात केवळ १२ धावा करून तो बाद झाला. सर्फराझ खानचे गेल्या सामन्यातील शतक आणि शुबमन गिलच्या पुनरागमनानंतर आता त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन म्हणाले होते की, संघ केएल राहुलच्या जागेबाबत कोणताही घाईघाईत निर्णय घेऊ इच्छित नाही. संजू सॅमसनप्रमाणेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही त्याला आणखी संधी द्यायची आहे. तो चांगली फलंदाजी करत असून मानसिकदृष्ट्या तो सुस्थितीत आहे. दुसरीकडे, गंभीरने दुसऱ्या कसोटीपूर्वी केएल राहुलबद्दलही म्हटले होते की, बाहेर काय घडत आहे याने काही फरक पडत नाही. राहुलबाबत संघ व्यवस्थापन निर्णय घेईल आणि परिस्थिती पाहून टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन ठरवले जाईल.