Yuvraj Singh explosive batting video viral : २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाचा हिरो ठरलेला युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपल्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या सेमीफायनलमध्ये युवराज सिंगने वादळी खेळी साकारात ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्यासाठी टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. युवराज सिंगने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात २८ चेंडूत ५९ धावांची शानदार खेळी केली. युवराज सिंगच्या या झंझावाती खेळीत ५ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवराज सिंगने ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्सविरुद्ध २१०.७१ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात भारत चॅम्पियन्सने प्रथम फलंदाजी करताना २५४ धावा केल्या. इंडिया चॅम्पियन्ससाठी रॉबिन उथप्पा (३५ चेंडूत ६५ धावा), युवराज सिंग (२८ चेंडूत ५९ धावा), युसूफ पठाण (२३ चेंडूत ५१ धावा) आणि इरफान पठाण (१९ चेंडूत ५० धावा) या तिघांनीही तुफान खेळी केली. भारताच्या २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया चॅम्पियन संघ २० षटकांत ७ विकेट गमावून केवळ १६८ धावाच करू शकला. अशा प्रकारे भारत चॅम्पियनशिपन्सने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सचा ८६ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला जुन्या दहशतीची आठवण करून दिली –

या सामन्यासाठी युवराज सिंगला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला आपल्या जुन्या दहशतीची आठवण करून दिली. युवराज सिंगने २००७ टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. याशिवाय २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६५ चेंडूत ५७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. युवराज सिंगमुळे ऑस्ट्रेलियाला या दोन्ही प्रसंगी पराभवाला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा – जेम्स अँडरसन: वयाला वाकुल्या दाखवणारा इंग्लंडचा आधारवड

नेगी आणि कुलकर्णी यांची गोलंदाजीत कमाल –

ऑस्ट्रेलियन चॅम्पियन्स संघ २५५ च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला,तेव्हा त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. मध्ये त्यांची पहिली विकेट तीन धावांवर पडली. यानंतरही त्यांच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत राहिल्या. त्यामुळे ८० धावांवर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. टीम पेनने ४० धावांची खेळी नक्कीच खेळली पण तोही ऑस्ट्रेलियन चॅम्पियन संघाला सेमीफायनलमधील मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही. भारतीय चॅम्पियन्ससाठी गोलंदाजीमध्ये पवन नेगी आणि धवल कुलकर्णी यांनी २-२ विकेट्स घेतल्या, तर राहुल शुक्ला, इरफान पठाण आणि हरभजन सिंग यांनी १-१ प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India champions beat australia by 86 runs in wlc 2024 semifinal watch yuvraj singh explosive batting video vbm