India Paralympics Medals 2024: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा अ‍ॅथलिटने ६ दिवसांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने २० पदकांचा टप्पा गाठून भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास घडवला आहे. भारताच्या खात्यात आता एकूण २० पदके आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.

पॅरिसपूर्वी भारताने टोकियो २०२० मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १९ पदके जिंकली होती. पण आता पॅरिसमध्ये पहिल्या ६ दिवसातच भारतीय पॅरा अ‍ॅथलिट्सने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढला आहे.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला

हेही वाचा – Paris Paralympics 2024: भारताने पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवसात जिंकली तब्बल ८ पदकं, भालाफेक, बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकं; भारत पदकतालिकेत कितव्या स्थानी?

Paris Paralympics 2024: सहाव्या दिवशी भारताने केली ५ पदकांची कमाई

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ४ खेळांमध्ये पदकं जिंकली आहेत. त्यापैकी सर्वाधिक १० पदकं ॲथलेटिक्समधून आली आहेत. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये ५ तर नेमबाजीत ४ पदके आली आहेत. तिरंदाजीतून एक पदक मिळाले आहे. भारताने ३ सप्टेंबरला म्हणजेच सहाव्या दिवशी ५ पदकं जिंकली. दीप्ती जीवनजी, शरद कुमार, मरियप्पन थांगावेलू, अजित सिंग आणि सुंदर गुर्जर यांनी ही पदकं जिंकली.

बुधवारी, पुरुषांच्या भालाफेक F46 फायनलमध्ये, अजित सिंगने ६५.६२ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले आणि सुंदर सिंग गुर्जरने ६४.९६ मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील ॲथलेटिक्समधील भारताचे हे पहिले दुहेरी पदक होते.

हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल

पुरुषांच्या उंच उडी T63 फायनलमध्ये भारताच्या दोन्ही खेळाडूंनी पदकं जिंकली. शरद कुमार (T42) याने १.८८ मीटरच्या सर्वोत्कृष्ट उडीसह रौप्य पदक जिंकले आणि T42 प्रकारात नवीन पॅरालिम्पिक विक्रमही केला. शरदने टोकियो २०२१ मध्ये जिंकलेल्या कांस्यपदकाचे पॅरिस २०२४ मध्ये रौप्यपदकात रूपांतर केले. तर, मरियप्पन थांगावेलू (T42) याने १.८५ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा – बांगलादेशविरूद्धच्या मालिकेपूर्वी BCCIकडून मोठे फेरबदल, निवड समितीविषयी घेतला महत्त्वाचा निर्णय

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी

भारत १९६८ पासून पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहे. पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खातेही उघडले नव्हते. यानंतर १९७२ मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले. भारताने पुढच्या २ पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला नाही, पण १९८४ मध्ये भारतीय पॅरा अ‍ॅथलिट ४ पदकं जिंकण्यात यशस्वी झाले. यानंतर पुन्हा एकदा भारताला पुढील ४ पॅरालिम्पिकमध्ये खातेही उघडता आले नाही. त्यानंतर २००४ च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये भारताने २ पदकांची कमाई केली.

२००८ बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावता आले नाही आणि २०१२ लंडन पॅरालिम्पिकमध्ये केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले. २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने ४ पदके जिंकली होती. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदकं जिंकून नवा विक्रम घडवला आणि आता पॅरिसमध्ये भारताने टोकियोमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.

Story img Loader