India Paralympics Medals 2024: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा अॅथलिटने ६ दिवसांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने २० पदकांचा टप्पा गाठून भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास घडवला आहे. भारताच्या खात्यात आता एकूण २० पदके आहेत. यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पॅरिसपूर्वी भारताने टोकियो २०२० मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १९ पदके जिंकली होती. पण आता पॅरिसमध्ये पहिल्या ६ दिवसातच भारतीय पॅरा अॅथलिट्सने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मोडीत काढला आहे.
Paris Paralympics 2024: सहाव्या दिवशी भारताने केली ५ पदकांची कमाई
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ४ खेळांमध्ये पदकं जिंकली आहेत. त्यापैकी सर्वाधिक १० पदकं ॲथलेटिक्समधून आली आहेत. त्याचबरोबर बॅडमिंटनमध्ये ५ तर नेमबाजीत ४ पदके आली आहेत. तिरंदाजीतून एक पदक मिळाले आहे. भारताने ३ सप्टेंबरला म्हणजेच सहाव्या दिवशी ५ पदकं जिंकली. दीप्ती जीवनजी, शरद कुमार, मरियप्पन थांगावेलू, अजित सिंग आणि सुंदर गुर्जर यांनी ही पदकं जिंकली.
बुधवारी, पुरुषांच्या भालाफेक F46 फायनलमध्ये, अजित सिंगने ६५.६२ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले आणि सुंदर सिंग गुर्जरने ६४.९६ मीटरच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील ॲथलेटिक्समधील भारताचे हे पहिले दुहेरी पदक होते.
हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल
पुरुषांच्या उंच उडी T63 फायनलमध्ये भारताच्या दोन्ही खेळाडूंनी पदकं जिंकली. शरद कुमार (T42) याने १.८८ मीटरच्या सर्वोत्कृष्ट उडीसह रौप्य पदक जिंकले आणि T42 प्रकारात नवीन पॅरालिम्पिक विक्रमही केला. शरदने टोकियो २०२१ मध्ये जिंकलेल्या कांस्यपदकाचे पॅरिस २०२४ मध्ये रौप्यपदकात रूपांतर केले. तर, मरियप्पन थांगावेलू (T42) याने १.८५ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह कांस्यपदक जिंकले.
हेही वाचा – बांगलादेशविरूद्धच्या मालिकेपूर्वी BCCIकडून मोठे फेरबदल, निवड समितीविषयी घेतला महत्त्वाचा निर्णय
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी
भारत १९६८ पासून पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहे. पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे खातेही उघडले नव्हते. यानंतर १९७२ मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले. भारताने पुढच्या २ पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला नाही, पण १९८४ मध्ये भारतीय पॅरा अॅथलिट ४ पदकं जिंकण्यात यशस्वी झाले. यानंतर पुन्हा एकदा भारताला पुढील ४ पॅरालिम्पिकमध्ये खातेही उघडता आले नाही. त्यानंतर २००४ च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये भारताने २ पदकांची कमाई केली.
२००८ बीजिंग पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावता आले नाही आणि २०१२ लंडन पॅरालिम्पिकमध्ये केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले. २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने ४ पदके जिंकली होती. त्यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदकं जिंकून नवा विक्रम घडवला आणि आता पॅरिसमध्ये भारताने टोकियोमधील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.