‘‘कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ हा सर्वात युवा आहे. राष्ट्रीय निवड समितीने २७ ते २८ वर्षांखालील खेळाडूंची निवड करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे तरुण पिढीला उत्तेजन मिळणार आहे. आगामी विश्वचषक स्पध्रेत आपले तरुण खेळाडू उत्तम खेळ करतील,’’ असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केला.
थेरगाव येथे शशि काटे स्पोर्ट्स फाऊंडेशच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व भारताच्या संघासाठी खेळाडू घडतील, असा आशावाद बोर्डे यांनी प्रकट केला. यावेळी चौथ्या चंदू बोर्डे चषक क्रिकेट स्पध्रेचे उद्घाटन बोर्डे यांच्या हस्ते पीसीएमसीच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मदानावर करण्यात आले. यावेळी शशि काटे स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष व संयोजक शशिकांत काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक नाना काटे, पीसीएमसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत िझजुर्डे, पवना बँकेचे संचालक जयनाथ काटे, उद्योजक अशोक साठे, पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, युवा नेते महेश बारणे, अमित जगताप आदी उपस्थित होते.
विस्टकोर (पुणे) विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात हेंमत पाटील अकादमीच्या संघाने २१ धावांनी विजय मिळवला. धावांनी सामना जिंकला. हेमंत पाटील संघाच्या विनय पाटीलने ३० चेंडूंत ५५ धावा करून सामनावीर किताब पटकावला. विस्टकोरच्या विरार आवटेची ६८ धावांची खेळी अयशस्वी ठरली. पाटील अकादमीच्या लक्ष्मण आतकरेने चार षटकांत ३१ धावा देऊन ४ बळी घेतले.

Story img Loader