Shreyas Iyer and his mother buy apartment in Mumbai : भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि त्याची आई रोहिनी अय्यर यांनी मुंबईतील वरळी भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल २.९० कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं आहे. तसेच हे अपार्टमेंट ५२३ चौरस फूट आकाराचे असून ५५ हजार २३८ रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केल्याचीही माहिती आहे.

१९ सप्टेंबर रोजी झाली अपार्टमेंटची नोंदणी

हिंदुस्तान टाइम्सने झॅप्की या वेबसाईटच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, वरळीच्या आदर्श नगर भागातील त्रिवेणी इंडस्ट्रियल सीएचएसएलच्या दुसऱ्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. १९ सप्टेंबर २०२४ रोजी या अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी श्रेयस अय्यरने १७.४० लाख रुपयांची स्टॅंप ड्यूटी तसेच ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याचे सांगण्यात येत आहे.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
Sale of Jagannath Baba Sansthans land without permission Former MLAs allege against Mahavikas Aghadi candidate
वणी येथील जगन्नाथबाबा संस्थानची जमीन विनापरवानगी विक्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर माजी आमदारांचा आरोप

हेही वाचा – Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल

यापूर्वी लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही खरेदी केलं होतं घर

खरं तर मालमत्ता खरेदीवरून श्रेयस अय्यर पहिल्यांदाच चर्चेत आला, असं नाही. यापूर्वीदेखील मालमत्ता खरेदीवरून चर्चेत आला होता. २०२० मध्ये श्रेयसने मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही ३८० चौरस फुटांचे अपार्टमेंट खरेदी केले होते. द वर्ल्ड टॉवर्सच्या ४८व्या मजल्यावर हे घर खरेदी करण्यात आलं होतं.

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ‘आम्ही जे काही कठोर पाऊल उचलले…’, जय शाहांचे श्रेयस-इशानबाबत मोठे वक्तव्य

दरम्यान, श्रेयस अय्यर सध्या भारतीय संघाबाहेर आहे. मागील काही कालावधीपासून तो संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतो आहे. त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. काही दिवसांपूर्वी तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर श्रेयस लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेन, असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.