India defeated UAE by 78 runs in T20 Women’s Asia Cup 2024 : महिला आशिया चषक २०२४ मध्ये भारताने सलग दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने यूएईचा ७८ धावांनी पराभव केला. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता दुसरा सामनाही जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २०२ धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान ऋचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांनी स्फोटक खेळी खेळली. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या यूएईचा संघ ७ गडी गमावून केवळ १२३ धावा करू शकला. अशा प्रकारे भारतीय महिला संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दोनशे धावांचा टप्पा इतिहास रचला. त्याचबरोबर २०१ धावा ही महिला टी-२० आशिया कपच्या इतिहासातील कोणत्याही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in