Team India records in Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना कराचीच्या मैदानावर खेळला जात आहे. त्याच वेळी, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीचे सर्व सामने दुबईतील मैदानावर खेळेल. भारतीय संघ पहिल्या हंगामापासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भाग घेत आहे आणि दोनदा जेतेपद जिंकले आहे. या स्पर्धेत पाच संघ असे आहेत ज्यांच्याविरुद्ध भारताने आजपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. ते कोणते संघ आहेत? जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ अजिंक्य –

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात, भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, केनिया, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या पाच संघांविरुद्ध अद्याप एकही सामना गमावलेला नाही. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आफ्रिकन संघाविरुद्ध एकूण चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाच संघांविरुद्ध एकही सामना गमावला नाही:

दक्षिण आफ्रिका – ४ सामने
इंग्लंड – ३ सामने
केनिया – २ सामने
बांगलादेश – एक सामना
झिम्बाब्वे – एक सामना

पहिला सामना बांगलादेश खेळणार –

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होईल. यानंतर, भारतीय संघाला २३ फेब्रुवारी रोजी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. यानंतर तिसरा सामना भारतीय संघाला २ मार्च रोजी न्यूझीलंडवर मात करावी लागेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये, भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध वरचढ आहे आणि आकडेवारी याची साक्ष देते. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण ४१ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने ३२ तर बांगलादेशने फक्त ८ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India did not lose a single match against five teams in the champions trophy history vbm