India Failed To Reach WTC Final First Time in History: ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत भारताचा ६ विकेट्सने पराभव करत मालिका ३-१ ने जिंकली. यासह भारताने तब्बल १० वर्षांनी भारताला पराभूत करत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे, जिथे आता त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल. यासह भारतीय संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्न भंगलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाला ही कसोटी मालिका बरोबरीत संपवण्यासाठी कोणत्याही किंमतीत हा सामना जिंकावा लागणार होता, पण अवघ्या तीन दिवसांतच टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला. या पराभवाचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवरही परिणाम झाला आहे. आता फायनलमध्ये पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या सर्व आशा संपल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक

भारत आता २०२३-२५ ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका कोणत्याही परिस्थितीत बरोबरीत संपवावी लागली. मात्र ती तसे करण्यात अपयशी ठरली. म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा टीम इंडियाशिवाय अंतिम सामना खेळवला जाईल.

हेही वाचा – IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने गुलाबी रंगाचे पट्टे असलेली जर्सी का घातली? जाणून घ्या कारण

यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा टीम इंडिया अंतिम सामना खेळणार नाही. याआधी दोन्ही वेळा भारतीय संघाने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. पण यावेळी टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये विशेष काही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाबरोबरच भारतातच खेळली गेलेली न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकाही भारताने पूर्वी गमावली होती.

हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​ची सुरुवात टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेने केली होती. भारतीय संघाने ही मालिका १-० ने जिंकली. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली २ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी झाला. टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकली. यानंतर २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतही बांगलादेशचा २-० असा पराभव केला. मात्र त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभव पत्करावा लागला.

टीम इंडिया अपात्र ठरल्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आधीच फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले होते आणि आता ऑस्ट्रेलियानेही फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. गतवर्षीचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आहे.