भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी सामने जिंकताना खेळातील सर्व आघाडय़ांवर वर्चस्व सिद्ध केले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे.
‘‘या मालिकेतील विजयामुळे संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीत परिपक्वता येण्यास मदत मिळाली आहे. त्यांना उज्ज्वल भवितव्य आहे. भारताला हे यश मिळवून दिले आहे, त्यामध्ये युवा खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. या खेळाडूंना ८ ते १० वर्षे आणखी खेळण्याची संधी मिळणार आहे. कसोटी क्रिकेटपुढे अनेक आव्हाने असताना या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत आपले भविष्य उज्ज्वल केले आहे. युवा खेळाडूंनी खूपच लक्षणीय प्रगती केली आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
सर्वच आघाडय़ांवर भारताचे वर्चस्व -गावस्कर
भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी सामने जिंकताना खेळातील सर्व आघाडय़ांवर वर्चस्व सिद्ध केले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे.
First published on: 25-03-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India dominance on all fronts gawaskar