न्यूझीलंडविरूद्धच्या दुस-या कसोटीत पहिल्या डावात भारताने २४६ धावांची आघाडी घेत वेलिंग्टन कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला न्युझीलंडविरूद्ध २४६ धावांची आघाडी घेणे शक्य झाले. तत्पूर्वी भारताला डावाची दमदार सुरूवात करून देणा-या शिखर धवनचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. त्यांनतर मुंबईकर अजिंक्य रहाणेने कर्णधार धोनीच्या साथीने ८० धावांची भागीदारी रचल्यामुळे भारताला पहिल्या डावात ४३८ धावांची मजल मारता आली. अजिंक्य रहाणेने 149 चेंडूत कारकिर्दीतील पहिल शतक झळकावलं. कोरी अँडरसनला चौकार ठोकून रहाणेनं अनोख शतक साजरं केलं. मात्र, रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. जिमी निशामच्या गोलंदाजीवर रोहित भोपळाही न फोडता माघारी परतला. तर विराट कोहली 38 धावांवर बाद झाला. भारताचा डाव आटोपल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्युझीलंडने दिवसाखेर १ बाद २४ धावा केल्या आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा