कसोटी क्रिकेटमध्ये ५०० वा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाच्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत भारताची जागा आता न्यूझीलंडने घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांपेक्षा कसोटी सामने अधिक खेळताना दिसला आहे. याचा परिणाम भारताच्या एकदिवसीय क्रमवारीवर झाल्याचे दिसते. आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या क्रमवारीत १२४ गुणांसह ऑस्ट्रेलियाने आपले अग्रस्थान कायम ठेवले असून भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत असणाऱ्या न्यूझीलंडने ११३ गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in