फ्रान्स आणि पोलंड यांना नमवून जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरीत दरारा निर्माण करणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघासमोर शुक्रवारी बलाढय़ पाकिस्तानचे आव्हान आहे. ‘अ’ गटातील या लढतीत भारताची तयारी योग्य दिशेने चालली आहे की नाही, हे पाहण्याच्या दृष्टीने ही लढत फार महत्त्वाची आहे. कारण भारताला कडवी टक्कर देण्याची धमक पाकिस्तान संघामध्ये आहे.
आशियाई स्पर्धा विजेता भारत आणि चॅम्पियन्स चषक स्पध्रेत रौप्यपदक विजेता पाकिस्तान यांच्यातील ही लढत उत्कंठा वाढवणारी आहे. भारताने रिओ ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित केल्यामुळे ते या स्पध्रेत दबावाविना खेळत आहेत, तर पाकिस्तानसाठी ही स्पर्धा ऑलिम्पिक प्रवेश मिळवण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रमक खेळ पाहायला नक्की मिळेल. या सामन्यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित करणार आहे.
भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर हे दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. चॅम्पियन्स चषक स्पध्रेतील त्या लढतीत विजयानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंनी बेभान जल्लोष केला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे शुक्रवारच्या लढतीत तणावपूर्ण वातावरण नक्की पाहायला मिळेल. या स्पध्रेतील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास भारताने फ्रान्स (३-२) आणि पोलंड (३-०) यांच्यावर विजय साजरे केले आहेत. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून (१-६) लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता़, मात्र पोलंडवर (२-१) विजय मिळवून त्यांनी पुनरागमन केले आहे.
जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी : भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान विजयी हॅट्ट्रिकची संधी
फ्रान्स आणि पोलंड यांना नमवून जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरीत दरारा निर्माण करणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघासमोर शुक्रवारी बलाढय़ पाकिस्तानचे आव्हान आहे. ‘
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-06-2015 at 06:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India face pakistan test in hockey world league semi final