भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सध्या सोशल मीडियावर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कसोटी विक्रम केलेल्या आपल्या बॅटचा फोटो शेअर केला होता. आता त्याने आपल्या जुन्या स्कूटरचे फोटो पोस्ट केले आहेत. या स्कूटरलबद्दल अझरुद्दीनने जुनी आठवण सांगितली आहे.

अझर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”सुरुवातीच्या काळात मी या स्कूटरवर बसून सकाळच्या सरावासाठी जात होतो. माझी गुणवत्ता पाहून मला ही स्कूटर मिळाली होती. सकाळी सरावाला जाण्यासाठी लांब चालत चालण्यापेक्षा किंवा सायकलचा वापर करण्यापेक्षा ही स्कूटर ऐश आरामाची गोष्ट होती.”

हेही वाचा – काय सांगता..! विराटचा ‘जिगरी दोस्त’ यजुर्वेंद्र चहल CSK कडून खेळणार?

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात सलग तीन शतक ठोकत अझरुद्दीनने विक्रम केला होता, जो अजूनही अबाधित आहे. हा विक्रम ज्या बॅटने केला होता, त्या बॅटचे फोटो अझरुद्दीनने सर्वांसमोर शेअर केले होते. या बॅटने १९८४-८५मध्ये त्याने पहिल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध सलग शतके ठोकली. एका हंगामात अझरुद्दीनने या बॅटने ८००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याच्या आजोबांनी ही बॅट निवडली होती.

 

हेही वाचा – सुनील गावसकर म्हणतात, ‘‘भारत इंग्लंडला ४-० ने हरवेल”

अझरुद्दीनने भारताकडून ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यात त्याने ४५.०३च्या सरासरीने ६२१५ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यात त्याने ३६.९२च्या सरासरीने ९३७८ धावा केल्या आहेत. अझरुद्दीनने तीन विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले होते.

Story img Loader