6 ते 16 जून दरम्यान ओडीशातील भुवनेश्वर येथे रंगणाऱ्या FIH Hockey Series Finals स्पर्धेसाठी भारतीय संघासमोर तुलनेने सोपं आव्हान असणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने या स्पर्धेची गटवारी जाहीर केली आहे. 2020 रोजी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ही स्पर्धा महत्वाची मानली जात आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम दोन संघांना ऑलिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश मिळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळवली जाणार आहे. आशियाई खेळांचं विजेतेपद पटकावणारं जपान आणि यजमान भारत या दोन देशांचा अपवाद वगळता कोणत्याही संघाकडून भारताला कडवं आव्हान मिळणार नाहीये. या स्पर्धेत भारताला मेक्सिको, पोलंड, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि उझबेगिस्तानचा सामना करायचा आहे.
FIH Series Finals : भारतीय हॉकी संघासमोर तुलनेने सोपं आव्हान
ओडीशात रंगणार सामने
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 22-01-2019 at 10:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India get easy group in fih series finals venues confirmed too