भारतीय संघ सध्या फक्त मायदेशातच नाही तर परदेशातही स्पर्धा सातत्याने जिंकत असल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. या जोरावर आगामी विश्वचषक जिंकण्याचा भारताला प्रबळ आत्मविश्वास असल्याचे मत भारताला १९८३ साली विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
‘‘भारतीय संघ सातत्याने विदेशात विजय मिळवीत असल्याने त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत चालला आहे. माझ्या मते जेव्हा त्यांनी इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक पटकावला तेव्हा त्यांचा स्वत:वरील विश्वास अधिक दृढ झाला. भारतीय संघ सध्या जसा खेळत आहे तसाच तो खेळत राहिला तर हा विश्वचषकही भारतीय संघ जिंकेल,’’ असे कपिल म्हणाले.
पाकिस्तानवर १९९२ च्या विश्वचषकात मिळवलेला विजय अविस्मरणीय असल्याचे मत भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader