Indian squad a changes ahead of 2nd Test : सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला. या विजयासह आफ्रिकन संघाने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. या कसोटीसाठी बीसीसीआयने संघात एक बदल केला आहे. बोर्डाने वेगवान गोलंदाज आवेश खानचा भारतीय कसोटी संघात समावेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आवेश खानचा भारतीय कसोटी संघात मोहम्मद शमीच्या जागी समावेश करण्यात आला आहे. शमी दुखापतीमुळे मालिका सुरू होण्यापूर्वीच संघाबाहेर होता. त्यानंतरही बीसीसीआयने त्याच्या बदलीची घोषणा केली नव्हती.

याआधी सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर आयसीसीने आणखी एक धक्का दिला आणि स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाचे दोन गुण कमी केले. या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरली, तर आयसीसीने दोन पॉइंट्स कमी केल्यामुळे टीम इंडिया आणखी एक स्थानाने सहाव्या स्थानावर घसरली आहे.

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का, आयसीसीने केली मोठी कारवाई

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या सेना देशांच्या भूमीवर टीम इंडियाचा हा सलग पाचवा पराभव होता. २०२२ मध्ये जोहान्सबर्गमध्ये भारताला सात विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच वेळी, २०२२ मध्येच, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पुन्हा सात विकेट्सने पराभव केला. यानंतर २०२२ बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडने भारताचा सात विकेटने पराभव केला. २०२३ मद्ये, ओव्हल येथे झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी, आता पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि ३२ धावांनी पराभव केला आहे.

हेही वाचा – IND vs SA : विराट कोहलीने रचला इतिहास! १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India have made one change to their squad for the second india vs south africa 2nd test beginning 3rd january vbm