IND vs ENG India Highest Powerplay Score in T20I: भारत वि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना हा रेकॉर्डब्रेक सामना होता. अनेक विविध रेकॉर्ड या सामन्यात मोडले आहेत. अभिषेक शर्माच्या उत्कृष्ट फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघानेही धावांचा विक्रम मोडला आहे. तर अभिषेक शर्माने १० षटकांच्या जोरावर भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले आहे. तर दुसरे सर्वात जलद अर्धशतकही झळकावण्याचा विक्रम त्याने केला आहे.
अभिषेक शर्माच्या दुसऱ्या सर्वात जलद अर्धशतकाच्या जोरावर भारताने पॉवरप्लेमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. अभिषेकच्या झंझावाती अर्धशतकामुळे भारताला पॉवरप्लेमध्ये ९५ धावा करता आल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. यापूर्वी, पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाचा सर्वोच्च स्कोअर २ बाद ८२ धावा होता जो २०२१ मध्ये केला होता.
T20I सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या
९५/१ वि. इंग्लंड वानखेडे, २०२५
८२/२ वि. स्कॉटलंड दुबई, २०२१
८२/१ वि. बांगलादेश हैदराबाद, २०२४
७८/२ वि. दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग, २०१८
अभिषेक शर्माने दणदणीत शतक झळकावत भारतासाठी टी-२० मध्ये दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. अभिषेकच्या शतकासह भारताच्या शिवम दुबेने झटपट ३० धावा करत बाद झाला. यासह भारतीय संघाने २० षटकांत २४७ धावांचा मोठा डोंगर वानखेडे स्टेडियमवर उभारला आहे. भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने जिंकत ही टी-२० मालिका आधीच आपल्या नावे केली आहे. यासह आता इंग्लंडला विजयासाठी २४८ धावांचे लक्ष दिले आहे.
भारत वि इंग्लंड पाचव्या टी-२० साठी प्लेईंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन):
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन):
फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.