भारतीय पुरुष हॉकी संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर केलेल्या मानांकनात आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारताने बेल्जियम व न्यूझीलंडला मागे टाकून ही कामगिरी केली आहे. बेल्जियमची तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. न्यूझीलंड संघ सातव्या क्रमांकावररून आठव्या क्रमांकावर खाली घसरला. इंग्लंड व अर्जेन्टिना यांनी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर असलेल्या अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स व जर्मनी यांच्या क्रमवारीत काहीही बदल झालेला नाही.
महिलांमध्ये भारताचे तेरावे स्थान कायम राहिले आहे. ऑलिम्पिक व विश्वविजेत्या नेदरलँड्सने अव्वल स्थान राखले आहे. ऑस्ट्रेलिया व अर्जेन्टिना हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
भारतीय पुरुष हॉकी संघाला मानांकनात सहावे स्थान
भारताने बेल्जियम व न्यूझीलंडला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.
First published on: 08-11-2015 at 02:40 IST
TOPICSभारतीय हॉकी
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India hockey team on no 6 in international ranking