भारतीय पुरुष हॉकी संघाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर केलेल्या मानांकनात आठव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारताने बेल्जियम व न्यूझीलंडला मागे टाकून ही कामगिरी केली आहे. बेल्जियमची तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. न्यूझीलंड संघ सातव्या क्रमांकावररून आठव्या क्रमांकावर खाली घसरला. इंग्लंड व अर्जेन्टिना यांनी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर असलेल्या अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स व जर्मनी यांच्या क्रमवारीत काहीही बदल झालेला नाही.
महिलांमध्ये भारताचे तेरावे स्थान कायम राहिले आहे. ऑलिम्पिक व विश्वविजेत्या नेदरलँड्सने अव्वल स्थान राखले आहे. ऑस्ट्रेलिया व अर्जेन्टिना हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India hockey team on no 6 in international ranking