India vs Spain Live Score, Paris Olympics 2024 Men’s Hockey Bronze Medal Match: भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताला चौथ पदक मिळवून दिलं आहे. भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ अशा फरकाने पराभव करत १४ वं ऑलिम्पिक पदक हॉकी संघाने पटकावलं आहे. या विजयासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले आहे. याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. भारतीय हॉकी संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. यापूर्वी १९६८ आणि १९७२ च्या ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारताचा गोलकिपर म्हणजेच भारतीय हॉकी संघाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या श्रीजेशचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, कांस्यपदकाला गवसणी घालत श्रीजेशच्या कारकीर्दीचा गोड शेवट झाला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा कांस्यपदकासाठी भारत वि स्पेन यांच्यात हॉकी सामना खेळवला गेला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण कोणताच संघ गोल करू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोल करत आघाडी मिळवली. यानंतर ३०व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली आणि यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पण स्पेन गोल करण्यात अपयशी ठरला. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल केला. यासह भारताने २-१ अशी आघाडी मिळवली.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान
Border Gavaskar Trophy History Stats Records Head to Head All You need To Know About India vs Australia Test Series
Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास

स्पेनच्या संघाने पहिल्या क्वार्टरमध्येच पहिला गोल केला. एका छोट्याशा चुकीचा फटका भारतीय संघाला सहन बसला. स्पेनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, त्याचे स्पेनने गोलमध्ये रूपांतर केले. यानंतर दुसरा क्वार्टर संपणार असताना ३० सेकंद आधी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्याचे कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोलमध्ये रूपांतर केले. याच्या काही वेळापूर्वीही भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, त्यावेळी हरमनप्रीत सिंगने कमांड हाती घेतली नव्हती. हरमनने त्यांनी अमित रोहितदासला संधी दिली. मात्र तो गोल होऊ शकला नाही. त्यानंतर हरमनप्रीतने पुनरागमन केले. यासह सामना बरोबरीत राहिला.

तिसरा क्वार्टर सुरू झाला तेव्हा भारतीय संघाने आक्रमक पवित्रा स्वीकारला. १५ मिनिटांनी भारताला पेनल्टीची दुसरी संधी मिळाली. यावेळीही कर्णधार हरमनप्रीतने पुढे येत पेनल्टीवर गोल करण्याची जबाबदारी स्वीकारली. हरमनप्रीतने आणखी एक गोल केला. यासह भारताला आघाडी मिळाली. यानंतर दोन्ही संघ गोल करण्याचा प्रयत्न करत राहिले. पेनल्टी कॉर्नरही मिळाला, पण त्यात यश आले नाही. शेवटची ५ मिनिटे अतिशय मनोरंजक स्पर्धा होती. दोन्ही संघ आक्रमक दिसत असले तरी गोल करण्यात त्यांना यश आले नाही.

भारत आणि स्पेनच्या संघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले. मात्र, दोन्ही संघांना आपापल्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला जर्मनीविरुद्ध किरकोळ पराभवाला सामोरे जावे लागले, तर स्पॅनिश संघाने नेदरलँडविरुद्ध जवळपास एकतर्फी सामना गमावला. भारतीय हॉकी संघाने यापूर्वी २०२० मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यावर्षीही भारताने शानदार खेळ केला आणि उपांत्य फेरी गाठली, पण तिथेही सुवर्ण आणि रौप्यपदकांच्या शर्यतीपूर्वी एक सामना गमावला. यानंतर भारत आणि जर्मनी यांच्यात कांस्यपदकाची लढत झाली, त्यात भारतीय हॉकी संघाने सामना जिंकून कांस्यपदक पटकावले.